पुणे शहरात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा खून,
Deepak maratkar murdered : पुण्यातील गौरी आळी येथे घडली घटना.
Deepak maratkar murdered : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
पुणे शहरात खूनाचे सत्र सुरूच आहे काही ना काही शुल्क कारणांवरून राग मनात ठेवून थेट जिव घेण्याचे प्रकार राजरोसपणे घडत आहे.
रोजच कुठेना कुठे खून, खूनाचा प्रयत्नाचे प्रकार होत असल्याने पुणेकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री १ वाजता पुण्यातील मध्यवर्ती भागातील गौरी आळी येथे एका युवासेनेच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
दीपक विजय मारटकर वय ३६ असे खून झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे ते चिरंजीव होते.
मिळालेल्या माहितीनुसार पाच ते सहा हल्लेखोरांनी मारटकर यांच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले.
गंभीर जखमी झालेल्या मारटकर यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, २च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वाचा > भवानी पेठेतील सराईत गुन्हेगाराचा कोंढव्यात खुन
या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने मारटकर यांच्यावर खुनी हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
रात्री जेवण करून मारटकर बाहेर आले होते. दरम्यान आधीपासूनच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.
डोके, पाठ आणि छातीवर सपासप वार करून हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाल्याचे समजते.
सर्व हल्लेखोरांनी मास्क लावला होता. हल्लेखोर कोण होते हे शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहे.
वाचा : Police ka haath Congress Leader Rahul Gandhi k Girebaan par.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (crime in pune )पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे नव्या पोलीस आयुक्तांसमोर आव्हान