परराज्यातील महिलांना वेश्या व्यवसायात गुंतवुन त्याव्दारे स्वतःची उपजिविका भागवणारा पोलिसांच्या ताब्यात

The prostitution business: परराज्यातील महिलांना वेश्या व्यवसायात गुंतवुन त्याव्दारे स्वतःची उपजिविका भागवणारा विमानतळ पोलीसांच्या ताब्यात

The prostitution business
file photo

The prostitution business: Police news 24 : पुणे विमानतळ ठाण्याच्या हद्दीत येणारा अनेक भाग हा उच्चभू लोकांनी व्यापलेला आहे ,

या परिसरात राहण्यासाठी येणारे तरुण व तरुणी हे मोठ्या प्रमाणात बाहेर गावावरून आलेले असतात यात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे ,

अनेक विध्यार्थी हे होस्टेलमध्ये राहण्यास असून कोण कोठे काय करतोय हे त्यांच्या परिवाराला माहित हि होत नाही ,

बाहेरून आलेले विध्यार्थी व नोकरदार मंडळीना त्यांना चैनीची सोय करण्यासाठी अनेक मंडळी लपून छपून वेश्या व्यवसाय चालवत असतात ,

असाच एक प्रकार विमानतळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे .

मिळालेल्या माहिती अनुसार दिनांक ०७जुलै रोजी सहा पोलीस उपनिरीक्षक अविनाश शेवाळे त्यांना गोपनिय बातमी दारांमार्फत बातमी मिळाली की,

एक इसम ओयो हॉटेल, लेन नं २/ ए संजयपार्क विमाननगर पुणे येथे दोन महिलांना घेऊन वेश्या व्यवसाय चालवित आहे.

पिस्टल व जिवंत काडतुस विनापरवाना बाळगणारे कटटा गँग चे गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

सदरची माहिती त्यांनी स पो निरीक्षक जे.सी.मुजावर व वरिष्टांना कळविली मिळालेल्या बातमी प्रमाणे त्या ठिकाणी विमानतळ पोलिसांनी पाहणी केली असता सदर ठिकाणी महिला वेश्या व्यवसाय करीत असल्याचे दिसले ,

पोलिसांनी छापा कारवाई करून वेश्या व्यवसाय चालविणारा इसम नामे मनोहर विठ्ठल शिंदे, (वय ३३ वर्षे, धंदा नोकरी, रा. सदर मुळगाव मु.उतका, पो. तपसे चिंचोली, ता.औसा, जि. लातूर)

🖕 Click Here

यास अटक करण्यात आली असुन त्याचा साथीदार नामे महेश शिंदे (मुळगाव लातुर )हा असुन तो फरार झाला आहे.

घरफोडी व चोरी च्या प्रकरणात शिकलगरी टोळीतील गुन्हेगाराना अटक

त्याचा शोध तपास पथकामार्फत चालु आहे. पिडीत महिलांची नमुद आरोपीचे ताब्यातुन सुटका करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई ही विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, व तपास पथकातील अधिकारी स पो निरीक्षक जे.सी.मुजावर,

महिला पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस स्टाफ,अविनाश शेवाळे, लोहकरे, मोहन काळे, अजय खराडे, राहुल मोरे, पोना किरण अब्दागिरे, विनोद महाजन, नाना कर्चे,

विश्वनाथ गोणे, विकास धावडे, महिला पोलीस इटनर, महिला पोलीस चौधरी यांचे पथकाने केली
आहे.

दाखल गुन्हयाचा पुढील तपास विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) बळवंत मांडगे हे करीत आहेत.

रेशनिंग किट मधील तेल चोरी संदर्भात पोलीसात तक्रार दाखल

🖕 Click Here

3 thoughts on “परराज्यातील महिलांना वेश्या व्यवसायात गुंतवुन त्याव्दारे स्वतःची उपजिविका भागवणारा पोलिसांच्या ताब्यात

Comments are closed.