कारचालकाला लुटणाऱ्या टोळीचा खडक पोलिसांनी २४ तासांत केला पर्दाफाश

Crime branch news पुणे : शंकरशेठ रोडवरून पहाटेच्या वेळी जाणाऱ्या कारचालकाला आडवून जबरदस्तीने लुटणाऱ्या टोळीचा खडक पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका रिक्षाचालकासह चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून वाहने आणि चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रिक्षाचालक रवींद्र मधुकर ढावरे (४५, रा. शिवाजी आखाडा, जुना बाजार, मंगळवार पेठ), प्रथमेश उर्फ पत्या प्रमोद कांबळे (२३, रा. म्हसोबा मंदिर जवळ, कासेवाडी), विशाल शंकर कसबे (२३, रा. कासेवाडी, पोलिस चौकी जवळ, कासेवाडी)

 सुशील राजू मोरे (२०, रा. १० नंबर कॉलनी, कासेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात अब्दुल आहद हकीम खान (२७, रा. सईदा कॉलनी, जटवाडारोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोफत डिमॅट खाते उघडण्यासाठी क्लिक करा

🖕 Click Here

१४ सप्टेंबर रोजी पहाटे अडीचच्या सुमारास फिर्यादी अब्दुल खान हे त्यांच्या मित्राच्या आईवडिलांना घेण्यासाठी शंकरशेठरोडवरून कारमधून जात होते. त्यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरीक्षक राकेश जाधव व तपास पथकातील पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून रिक्षाचालक ढावरे याला अटक केली. त्याच्याकडे इतर आरोपींबाबत चौकशी केली असता त्याने त्यांच्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.

खडक पोलिसांनी उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी शंकरशेठरोड, सेव्हन लव चौक, नेहरूरोड आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले. त्यानंतर आरोपी हे स्थानिक असल्याची खात्री झाली. तपास पथकातील संदीप तळेकर आणि सागर घाडगे यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून उर्वरित आरोपींना अटक केली. पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे.

आरोपी रिक्षाचालक ढावरे याच्या रिक्षाला कार पाठीमागून धडकली. त्यानंतर ढावरे आणि फिर्यादी खान यांच्यात वाद झाले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या इतरांनीव ढावरे यांनी संगनमत करून खान यांना धमकावून त्यांच्याकडील रोख २० हजार रुपये व मोबाइल चोरून नेला.

🖕 Click Here