आत्महत्या करण्या अगोदर हडपसर पोलिसांनी युवकाला घेतले ताब्यात,
Hadapsar police : आत्महत्या करण्या अगोदर हडपसर पोलिसांनी युवकाला घेतले ताब्यात,

Hadapsar police : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे पोलीसांच्या तत्परतेने एका युवकांचे प्राण वाचले आहे. हडपसर पोलीसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
हकीकत अशी की एक युवक ( रा. शिवउन्नती रेसीडन्सी डी ४०२ इंद्रायणी मंगल कार्यालयाजवळ काळेपडळ हडपसर)
यांची पत्नी राणी यांनी पोलीसांना कळविले की पती दत्तात्रय याचे व माझे घरगुती कारणावरुन भांडण झाले आहे,
पती आत्महत्या करतो असे सांगुन गाडी घेऊन मोबाईल घरात ठेऊन गेले आहेत असे पोलीसांना कळवले.
गोळ्या झाडून पसार झालेल्या आरोपींना न्यायालयाने दिली पोलीस कस्टडी,
माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी तात्काळ सर्व नाकाबंदी पॉइंटला अलर्ट केले ,
सदर इसमाचे वर्णन तसेच दुचाकी स्पेलंडर गाडी क्रमांक एम एच- १२- ४५५२ असल्याबाबत,
व मगरपटटासिटी असा लोगो असलेली दुचाकीचे वर्णन देऊन युवकास ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या .
नमुद युवकाचा शोध घेत असताना नमुद इसम हे अर्ध्या तासात मगरपटटा हडपसर पुणे या ठिकाणी मिळुन आले,
त्यांना पोलीस ठाणे येथे आणुन त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी मतपरीवर्तन करुन पती पत्नी यांना समुउपदेशन करुन त्यांना घरी पाठवले.
पोलीसांनी तत्परतेने पतीचा शोध घेतल्या प्रकरणी महिलेने हडपसर पोलिसांचे आभार मानले.
समाज माध्यमातील अफवेने गरोदर मातांच्या चिंतेत वाढ

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (police custody) गोळ्या झाडून पसार झालेल्या आरोपींना पोलीस कस्टडी