वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील दुखापतीचा गुन्हा युनिट-३ शाखे कडून उघड
Warje Malwadi Police station: वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील दुखापतीचा गुन्हा युनिट-३ शाखे कडून उघड

Warje Malwadi Police station news : police news 24
पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीत काही दिवसापूर्वी एक मारामारीचा गुन्हा घडला होता
त्याची वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. ५१/२०२० नोंद झाली होती पण कोणी हा गुन्हा केला हे उघड होत नव्हते म्हणून
कलम ३२५, ३२४, ५०४, ३४ हा गुन्हा अज्ञात आरोपी विरुध्द दाखल असून सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ कडून चालू होता,
दि.३०/०१/२०२० रोजी पोलीस नाईक विल्सन डिसोझा यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की,
दाखल गुन्हा आरोपी नामे दिक्षांत लोंढे व त्याचे साथीदारांनी केलेला आहे व दिक्षांत लोंढे हा वनदेवी मंदिरा जवळ कर्वेनगर पुणे येथे येणार आहे.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीस
उपनिरीक्षक किरण अडागळे, पो.हवा.रामदास गोणते, पो.ना.सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा यांनी सापळा रचला
व दिक्षांत राजेंद्र लोंढे, वय-२३ वर्षे, रा.हिंगणे होम कॉलनी, बाबा गॅरेज समोर, प्लॅट नं-३८, कर्वेनगर, पुणे यास रात्रौ.०१/२० वाजताचे सुमारास पकडले आहे.
इतर बातमी : 7999 रुपयात वेबसाईट बनवा व आपला व्यवसाय जगभर पोहोचवा
सदरचा गुन्हा हा दिक्षांत लोंढे व त्याचे साथीदारांनी केला असल्याचे निष्पन्न झाले असून
त्यास पुढील कार्यवाही करीता वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर बच्चन सिंग,
सहा.पोलीस आयुक्त प्रतिबंधक गुन्हे डॉ.शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,
पोलीस उप-निरीक्षक किरण अडागळे, पोलीस कर्मचारी रामदास गोणते, विल्सन डिसोझा, सचिन गायकवाड यांनी केली असल्याची माहिती मिळाली.
इतर बातमी : धनकवडीतून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता
Girl missing Report : February 1, 2020 : पुणे : धनकवडी येथील बालाजी कृपा हौसिंग सोसायटी मध्ये राहणा-या समिना सादिक अली शेख वय ४५ वर्षे,
यांची मुलगी नामे कु. नफिसा सादिकअली शेख वय १९ वर्षे रा.सदर हि २९.०१.२०२० रोजी सकाळी ०९.३० वाजताच्या सुमारास
राहत्या घरातुन ऑफीसला जाते म्हणून निघून गेली असून ती अदयाप पर्यंत घरी परत आली नसल्याने
त्याची आई समिना सादिक अली शेख यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात मिसिंग ची रिपोर्ट दाखल केली आहे . अधिक वाचा

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (girl missing ) धनकवडी भागातून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता