सय्यदनगर परिसरात गोळीबार,एक जन गंभीर जखमी


🖕 Click Here

crime brach news प्रतिनिधी : पुणे : महंमदवाडी रोड परिसरात हॉटेल मध्ये बसलेल्या एका गुन्हेगारावर अचानकपणे गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून त्यात एक जन जखमी झाला आहे.

पच्चीस ऊर्फ फैजान रमजान शेख, (वय २१, रा. सय्यदनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. ही घटना महंमदवाडी रोड परिसरात सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

हे पण वाचा: पतिचा पत्निवर प्राणघातक हल्ला , पति विरोधात दत्तवाड़ी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Advertisement

पच्चीस याच्या पोटात गोळी घुसली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात शुरू आहेत. गुलाम खान असे आरोपीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,

पच्चीस ऊर्फ फैजान शेख याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. फैजान शेख आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत.

शेख हा रात्री महंमदवाडी रोड परिसरातून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला व ते पळून गेले. त्यातील एक गोळी पच्चीस ऊर्फ फैजान शेख याच्या पोटात घुसली. त्यात तो जखमी झाला.

🖕 Click Here
Advertisement

त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळी अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा पोलिस, उपायुक्त अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर खंडणी विरोधी पथक वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांच्यासह इतर अधिकारी व पोलिस अंमलदारांनी भेट दिली.

Advertisement
🖕 Click Here

One thought on “सय्यदनगर परिसरात गोळीबार,एक जन गंभीर जखमी

Comments are closed.