सय्यद नगर मधील पच्चीस या गुन्हेगारावर गोळीबार करणारे पोलिसांच्या ताब्यात


🖕 Click Here

crime brach news प्रतिनिधी : पुणे : सोमवारी रात्री महंमदवाडी रोड परिसरात फैजन शेख या गुन्हेगारावर अचानकपणे गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून त्यात तो जखमी झाला होता.

पच्चीस ऊर्फ फैजान रमजान शेख, (वय , २१, रा. सय्यदनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. ही घटना महंमदवाडी रोड परिसरात सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,

पच्चीस ऊर्फ फैजान शेख याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. फैजान शेख आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत.

Advertisement

शेख हा रात्री महंमदवाडी रोड परिसरातून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला व ते पळून गेले. त्यातील एक गोळी पच्चीस ऊर्फ फैजान शेख याच्या पोटात घुसली. त्यात तो जखमी झाला.

हेपण वाचा: मोफत डिमॅट खाते उघडण्यासाठी, लिंकवर क्लिक करा:

सराईत गुन्हेगार पच्चीस उर्फ फैजान रमजान शेख (वय. २१, रा. सय्यद नगर,) याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने चेतन बाळू जाधव (वय २१ रा. ससाणे नगर, अमित हाईट्स, हडपसर) आणि यश सुनिल ससाणे (रा. मोहम्मदवाडी) यांना अटक केली आहे.

🖕 Click Here
Advertisement

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या पथकाने केली आहे. पच्चीस ऊर्फ फैजान शेख याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. फैजान शेख आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत.

घटनास्थळी अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा ,सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (खंडणी विरोधी पथक-२,वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, श्रीहरी बहिरट वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उल्हास कदम यांच्यासह इतर अधिकारी व पोलिस अंमलदारांनी भेट दिली होती.

दरम्यान, खंडणी विरोधी पथक-२ चे पोलिस अधिकारी व अंमलदार हे फायरिंग करणाऱ्या आरोपींच्या मागावर होते. त्याचवेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांना आरोपी हे जुना मोदी खाना कॅम्प परिसरात असल्याची माहिती मिळाली. खातरजमा करण्यात आली. अखेर पोलिसांनी सापळा रचुन दोघांना अटक केली.

Advertisement

हे पण वाचा: पतिचा पत्निवर प्राणघातक हल्ला, पति विरोधात दत्तवाड़ी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

🖕 Click Here