अंडरवेअरवरुन भांडण
fighting for underwear :अंडरवेअरवरुन भांडण, पोलीसही चक्रावले..

fighting for underwear : police News:
नवी दिल्ली : लोक चोरी, लुटमार, हत्या, मारहाण आणि विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांची तक्रार नोंदवायला पोलीस ठाण्यात जातात.
पण मध्य प्रदेशात भोपाळमध्ये एक व्यक्ती चक्क अंडरवेअर संबंधी तक्रार नोंदवायला पोलीस ठाण्यात आला होता.
या माणसाची जी तक्रार होती, त्यामध्ये नेमकं काय करायचं? हा पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला होता.
त्याची नेमकी तक्रार काय होती?
कृष्णकुमार दुबे असे अंडरवेअर संबंधी तक्रार नोंदवायला आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो 46 वर्षांचा आहे.
टेलरला सांगितले होते, त्यापेक्षा त्याने छोटी अंडरवेअर शिवली अशी त्याची तक्रार होती. पोलिसांनी आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी त्याची मागणी होती.
हबीबगंज पोलिसांनी तक्रारदाराची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण तो काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता,
तेव्हा पोलिसांनी त्याला कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
येरवडा कारागृहातून कैदी पळाले : कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण?
महिलेनेही टेलरविरोधात केली होती तक्रार
हबीबगंज पोलिसांना अशा विचित्र तक्रारी हाताळण्याची सवय आहे. काही महिन्यांपूर्वी सरकारी सेवेत अधिकारी असणाऱी एक महिला टेलर विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती.
टेलरने खूप टाइट सलवार सूट शिवला असे तिचे म्हणणे होते. त्यावर टेलरने सांगितले कि, तीन महिन्यांपूर्वी महिलेने कपडे शिवण्यासाठी माप दिले होते.
पण त्यानंतर तिचे वजन वाढले. त्यावर महिलेने टेलरवर तिला जाडी म्हटल्याचा आरोप केला. अजूनही या वादावर तोडगा निघालेला नाही
लॉकडाउनमध्ये त्याची नोकरी गेली
कृष्णकुमार दुबेची अंडरवेअरची तक्रार इतरांसाठी हसण्याचा विषय असेल. पण त्याच्यासाठी तो खूप गंभीर विषय आहे. कृष्णकुमार दुबे सुरक्षा रक्षकाची नोकरी करायचा.
पण लॉकडाउनमुळे त्याची नोकरी गेली. त्याला रोजचे खर्च भागवण्यासाठी आता खूप कठिण परिस्थितीचा सामना करावा लागतोय.
जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी दुबेने मित्राकडून एक हजार रुपये कर्ज काढले होते. दोन अंडरवेअर शिवण्यासाठी त्याने दोन मीटर कापड घेतले होते.
हबीबगंज येथील टेलरकडे त्याने विकत घेतलेले कापड शिवण्यासाठी दिले. गुरुवारी टेलरने त्याला अंडरवेअर दिली.
पण अंडरवेअर फिट बसत नसल्याने त्याने पुन्हा साईजमध्ये बदल करण्यास सांगितला.
पण पुरेसे कापड नसल्याचे कारण देत टेलरने नकार दिला. त्यानंतर दुबेने थेट पोलीस ठाणे गाठले. पण कारवाई काय करायची,
हाच पोलिसांसमोर प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी त्याला कोर्टात जाण्याचा सल्ला दिला.
आपत्कालीन विभाग झाले आउट ऑफ रिच??:रूग्णांचे होताहेत हाल

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: ( recharge fraud case) ३९९ रुपयांचा मोबाईल रिचार्ज पडला ७७ हजार रुपयांत