महिला सफाई कर्मचारीचा विनयभंग; महापालिकेचे आरोग्य निरीक्षक, ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल.

Crime branch news: पुणे : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सफाई कामगार असलेल्या विधवा महिलेकडे शरीर सुखाची मागणी करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Miftahi Talbina ;

आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, ठेकेदार शिवाजी सुळ, आणि संजय वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बिबवेवाडीतील एका ४० वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी या महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत.फिर्यादी या असहाय व विधवा असल्याचे माहिती असताना मंगलदास माने याने त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली.

FREE डीमैट खाता खोलने के लिए यहां क्लिक करें.

तसेच पैशांची मागणी केली. त्या सुट्टीवरुन १० एप्रिल रोजी परत आल्यावर हजर होण्याची चिठ्ठी घेण्यासाठी ठेकेदार शिवाजी सुळ याच्याकडे गेल्या होत्या.

🖕 Click Here

त्यावेळी त्याने फिर्यादी यांना तू माने साहेबांकडे जा, तुम्ही जातीवर जाणार असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत त्यांनी या दोघांविरुद्ध तक्रार अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी संजय वाघमारे याने धमकी दिली.

दरम्यान, पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त शिरगावकर करीत आहेत.

🖕 Click Here