CRED APP मध्ये माहिती भरायला लावत ३ लाखांची केली फसवणूक,

(CRED APP ) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

(CRED APP ) क्राईम ब्रांच न्यूज (प्रतिनिधी) : पुणे : आजकाल ऑनलाईनद्वारे फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत.

बघता बघता बॅंकेतील संपूर्ण रक्कम सायबर चोरट्यांकडून हडपली जात आहे.

नागरिकांना पुणे पोलिसांकडून वारंवार सावधानतेचा इशारा देऊनही नागरिकांकडून चुका केल्या जात आहेत.

CRED APP कडून ३ लाखांपेक्षा जास्त रक्कम हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आंबेगाव बुद्रुक येथील एका ३२ वर्षीय इसमासोबत असा प्रकार घडला आहे.

त्याची फिर्याद भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात देण्यात आली असून मोनाफल्ली शेख पत्ता वेस्ट बंगाल

२) इक्वीटस स्मॉल फायनान्स बँक व बंधन बँक खाते धारक रजपुत सुरत गुजरात

३)कॅनरा बँक खाते धारक नाव समीर वेस्ट बंगाल

४) बंधन बँक खाते धारक नाव लोया राज्य आंध्रप्रदेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा : Join our Telegram , Facebook page for every update

हकीकत अशी की फिर्यादी यांचे राहते घरातुन त्यांचे वापरते वन प्लस मोबाईलचे

(oneplus mobile) CRED APP वरुन यातील फिर्यादी यांचे कडे कोटक महिंद्रा बँकेचा क्रेडीट कार्ड व स्टेट बँक ऑफ इंडिया चे क्रेडीट कार्ड असे क्रेडीट खाते असुन नमुद दोन्ही क्रेडीट कार्डसची सर्व डिटेल्स CRED APP या ॲपवर अपलोड करुन त्याद्वारे सर्व पेमेंट करतात.

🖕 Click Here

फिर्यादी यांनी नमुद CRED APP यावरुन बँक ऑफ इंडियाच्या बचत खाते यातुन रक्कम रु ८९ हजार ९४९ रूपयांची अशी भरणा
केली

परंतु भरणा झाल्याचा कोणताही एस.एम.एस संदेश प्राप्त न झाल्याने CRED APP चा कस्टमर केअर क्रमांक 8583020198 यावर संपर्क साधता कार्ड धारक मोनाफल्ली शेख

पत्ता वेस्ट बंगाल याने फिर्यादी यांना नमुद क्रेड एप मध्ये त्यांचे ईमेल आय.डी दोन्ही बँकेच्या क्रेडीट कार्ड ,

कार्ड नंबर, कार्डची एक्सपायरी डेट व गुगल सिक्युरीटी कोड अशी माहीती भरण्यास सांगितली.

सदरची कोणतीही माहीती तोंडी स्वरुपात न सांगता ते क्रेड एप यावरील अॅड्रेस मेन्यु मध्ये टाईप करुन भरताच त्याने फिर्यादी यांचे नमुद जी मेल अकाउंट

पासवर्ड त्याचेकडील विवो वी २०३६ या मोबाईलद्वारे रिसेट करुन मोबाईल फोन व नमुद जी मेल अकाउंट हॅक करुन त्याद्वारे संबंधीत बँकेच्या खातेधारकांनी

संगनमत करुन दोन्ही क्रेडीट कार्डद्वारे एकुण रक्कम रु ३ लाख १९ हजार ८०६ रूपये रकमेची आर्थिक फसवणुक केली आहे.

वाचा : कोंढव्यातील महिला गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ची कारवाई;

🖕 Click Here