गुन्हेगाराचा खून करून पसार झालेल्या आरोपींना दत्तवाडी पोलिसांनी 12 तासात केले अटक
(Dattawadi police arrested murderer) दत्तवाडी पोलिसांची उत्तम कामगिरी
(Dattawadi police arrested murderer) क्राईम ब्रांच न्यूज प्रतिनिधी:
पुणे : नवीन पोलीस आयुक्त रुजू झाल्यापासून ते अनेक मोठ मोठे गुन्हेरांच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करून गुन्हेगारी मोडून काढत आहे .
मोठ्या गुन्हेगारांवर कारवाई झाल्याने छोटे गुन्हेगार जे बिळात लपून बसले होते त्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे .
या पिल्लावळाना भलताच जोर आला असून आमच्यावर काहीच कारवाई होणार नसल्याच्या गैरसमजुतीतून यांना चांगलाच जोर आला आहे .
या पिल्लावळामुळे नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत असून दिवसाढवळ्या खून करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे .
असाच एक प्रकार दत्तवाडी परिसरात घडला असून यात एका गुन्हेगाराचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला आहे .