मोटार सायकल चोर कोंढवा पोलीसांच्या ताब्यात
(Kondhwa police arrest motorcycle thief) मोटार सायकल चोराकडून 02 स्प्लेंडर व 01 रॉयल एनफिल्ड असे 03 मोटार सायकल एकूण 1,70,000 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
(Kondhwa police arrest motorcycle thief) क्राईम ब्रांच न्यूज प्रतिनिधी:
पुणे: मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने त्याबाबत वरिष्ठाकडुन आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते.
कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपी याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार गणेश चिंचकर यांना माहिती मिळाली की,
बोपदेव घाटात गारवा हॉटेलच्या जवळ एक व्यक्ती हा संशयीत रित्या उभा असून त्याच्याकडे असणारी मोटार सायकल हिच्यावर नंबर प्लेट नाही ती चोरीची असून सदर मोटार सायकल ही तो कोणाला तरी विक्री करण्यासाठी वाई भागातून आलेला आहे.
कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील,
पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप – निरीक्षक प्रभाकर कापुरे तपास पथक अंमलदार पोलीस हवालदार कुंभार,
पोलीस शिपाई मिसाळ, पोलीस शिपाई राठोड, पोलीस नाईक धिवार, असे संशयीत व्यक्तीस पकडण्यासाठी गारवा हॉटेलच्या परिसरात जावून शोध घेत होते.

मिळालेल्या माहिती नुसार संशयित व्यक्ती हा गारवा हॉटेलच्या जवळ गाडीसह उभा असल्याचा दिसला.
तेव्हा त्यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारता त्याने ज्ञानेश्वर विजय जाधव,
(वय 23 वर्षे मुक्काम पोस्ट उडत्तरे, तालुका वाई, जिल्हा सातारा ) असे सांगितले.
त्याच्याकडे असणाऱ्या मोटार सायकलची चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देवु लागला.
तेव्हा त्यास ताब्यात घेवून अधिक तपास केला असता त्यांनी सदर मोटार सायकल ही कामठे पाटीलनगर,
कोंढवा पुणे याठिकाणावरून चोरी केली असल्याची कबुली दिली.
वाचा : महिला डॉक्टरच्या बाथरूम मध्ये एमडी डॉक्टराने बसविला कॅमेरा: डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात.
त्यावेळी त्याच्याकडील मोटार सायकल चासीस नंबर MBLHA10BFEHH67433 व
इंजिन नंबर HA10EREHH52650 वरून माहिती घेता मोटार सायकलबाबत कोंढवा पोलीस स्टेशन पुणे भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर आरोपीस दाखल गुन्ह्यामध्ये दिनांक 12 जुलै रोजी 3 वाजता अटक करून
त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने लोणंद पोलीस स्टेशन व खंडाळा पोलीस स्टेशन जिल्हा सातारा
हद्दीमधूनही मोटार सायकल चोरी केल्याचे कबूल केले.
त्याच्याकडून 02 स्प्लेंडर (splendor) व 01 (royal enfield) रॉयल एनफिल्ड असे 03 मोटार सायकल
एकूण 1,70,000 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग नामदेव चव्हाण, परिमंडळ 5 . पुणे शहर नम्रता पाटील ,
सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर राजेंद्र गलांडे,
यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे सरदार पाटील,
पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद यांचे देखरेखीमध्ये पोलीस उप – निरीक्षक प्रभाकर कापुरे तपास पथक अंमलदार पोलीस हवालदार कुंभार,
पोलीस नाईक पांडुळे, पोलीस शिपाई मिसाळ, पोलीस नाईक धिवार, पोलीस शिपाई राठोड, पोलीस शिपाई रत्नपारखी यांच्या पथकाने केली आहे.
वाचा : Naadbramha Idli सांबर मिळणार आता शुक्रवार पेठेत, ते ही चक्क 10 रुपयात.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Dattawadi police arrested murderer)गुन्हेगाराचा खून: आरोपींना 12 तासात अटक