50 हजाराची लाच घेताना प्रशासकीय अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळयात.
(Anti-corruption officer arrested )सहाय्यक प्रशासकीय अधिकारी शिवाजी बोखरे असे पकडण्यात आलेल्या अधिका-याचे नाव आहे .
(Anti-corruption officer arrested ) क्राईम ब्रांच न्यूज प्रतिनिधी:
पुणे: आपल्या येथे एक म्हण आहे “सरकारी काम ६ महिने थांब” जर लवकर काम करायचे असेल तर कागदावर नोटांचे ओझे ठेवले तर ६ मिनटात काम होईल.
30 हजार ते लाखो रुपये पगार घेणारे जेव्हा ३०० रुपये रोज कमावणा-या व्यक्तीना हजारो रुपये लाच मागत असतील तर त्या व्यक्तीच्या मनाची काय अवस्था होत असेल .
सदरील अधिकारी, कर्मचा-यांनवर कडक कारवाई व्हावी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आली आहे .

अश्या लाचखोर अधिकारी, कर्मचा-यांनवर कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हे सदैव तत्पर असते.
अश्याच एका भ्रष्ट अधिकाऱ्यावर काल कारवाई करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यास 16 जुलै रोजी 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी शिवाजी बोखरे असे पकडण्यात आलेल्या अधिका-याचे नाव आहे.
यांच्यावर झालेल्या कारवाही मुळे मनपात प्रंचड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी बोखरे हे शालेय शिक्षण विभागात सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आहेत.
त्यांनी 50 हजाराची लाचेची मागणी केली होती. त्याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती.
त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे. त्यांना नुकतीच 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822