(Rs 50 lakh ransom) क्राईम ब्रांच न्यूज प्रतीनिधी :
पुणे : शहरातील एका प्रसिद्ध उद्योगपतीला संचालनालयाच्या अंमलबजावणी ( ईडी ) व आयकर विभागाच्या नावाने खोटा बनाव रचून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे .
संतोष कपुरचंद राठोड ( वय ४८ , रा . शुक्रवार पेठ ) असे अटक केलेल्याचे नाव आहे .
न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .
याप्रकरणी एका उद्योगपतीने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती .
त्यावरून पोलिसांनी यापूर्वी रुपेश ज्ञानोबा चौधरी ( वय ४६ , रा . सहकारनगर ) याला अटक केली आहे .
तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे .
वाचा : शिक्षकाचा आठ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटार व मोबाइल असा ६० लाख २५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे .
रुपेश चौधरी , संतोष राठोड व त्याचे इतर साथीदारांनी २२ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता या उद्योगपतीला अमित मिरचंदानीच्या शनिवार पेठेतील कार्यालयात बोलावले .
यावेळी , आरोपींनी संगनमत करून उद्योगपती यांचे ग्रुपमधील एका कंपनीने डी.एच.एल. एफ . यांच्याकडून घेतलेल्या ६८ कोटी रुपये कर्जात घोटाळा झाला , असे सांगितले .
त्याप्रकरणात आयकर विभागाने ऑब्जेक्शन घेतले व अंमलबजावणी संचालनालय यांनी त्रुटी काढल्यात ,
असा बनाव केला व उद्योगपतीकडे 50 लाखाच्या खंडणीची मागणी केली .
खंडणी दिली नाही तर पाहून घेण्याची धमकी देखील दिली होती .
दरम्यान , फरार आरोपी संतोष राठोड याचा शोध घेत असताना ,
पोलीस कर्मचारी अशोक माने व शशिकांत दरेकर यांना बातमी मिळाली होती , की संतोष राठोड हा नातेवाइकांना भेटण्यासाठी घोरपडी पेठेत येणार आहे .
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे , उपनिरीक्षक संजय गायकवाड , सुनील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल पवार ,
सतीश भालेकर , विजेसिंग वसावे यांच्या पथकाने सापळा रचून राठोड याला पकडले असल्याची माहिती मिळाली .