गुन्हेगाराचा खून करून पसार झालेल्या आरोपींना दत्तवाडी पोलिसांनी 12 तासात केले अटक
(Dattawadi police arrested murderer) दत्तवाडी पोलिसांची उत्तम कामगिरी
(Dattawadi police arrested murderer) क्राईम ब्रांच न्यूज प्रतिनिधी:
पुणे : नवीन पोलीस आयुक्त रुजू झाल्यापासून ते अनेक मोठ मोठे गुन्हेरांच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करून गुन्हेगारी मोडून काढत आहे .
मोठ्या गुन्हेगारांवर कारवाई झाल्याने छोटे गुन्हेगार जे बिळात लपून बसले होते त्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे .
या पिल्लावळाना भलताच जोर आला असून आमच्यावर काहीच कारवाई होणार नसल्याच्या गैरसमजुतीतून यांना चांगलाच जोर आला आहे .
या पिल्लावळामुळे नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत असून दिवसाढवळ्या खून करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे .
असाच एक प्रकार दत्तवाडी परिसरात घडला असून यात एका गुन्हेगाराचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला आहे .
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून खून झाल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे .
खून करून पसार झालेल्या आरोपीना बापुजी बुवा, खिंड. देवकरवाडी मुळशी येथे जाऊन दत्तवाडी पोलिसांनी ४ गुन्हेगारांना अटक केली आहे.
अक्षय शिवाजी किरतकर्वे (वय २५, रा. दांडेकर पुल, शांतीनगर, दत्तवाडी) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
निखिल बाळ बोत्रे (वय ३०, रा. नवी पेठ), प्रविण ऊर्फ पिल्या गणपत गाडे (वय ३१, रा. शांतीनगर, दांडेकर पुल),
राकेश ऊर्फ रोहित प्रकाश खिलारे (वय ३७), सुरज संजय बोत्रे (वय २९, रा. नवी पेठ),
अमरदीप मुकुंद भालेराव (वय २८, रा. शांतीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वाचा : मोटार सायकल चोर कोंढवा पोलीसांच्या ताब्यात
पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणा-या अक्षय किरतकर्वे या गुंडाची टोळक्याने कोयत्याने सपासप वार करत हत्या केली होती ,
सदरील घटना रविवारी सायंकाळी घडली. अक्षयची हत्या केल्यानंतर या चौघांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता.
अक्षय किरतकर्वे हाही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपी व त्याची सहा महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती.
अक्षय व त्याचा भाऊ ओंकार हे जुन्या दत्तवाडी रोडवरून ११ जुलै रोजी सायंकाळी पावणे सात वाजता जात होते.
त्यावेळी जुन्या भांडण्यांच्या रागातून आरोपींनी कोयता, लाेखंडी रॉड व लाथाबुक्यांनी मारहाण करुन अक्षय याचा खून केला.यावेळी तेथे मोठी गर्दी जमली होती.
नागरिकांनी त्याच्या मदतीला येऊ नये म्हणून आरोपींनी हातातील हत्यारांची भिती दाखवून दहशत निर्माण केली.
कोणीही मध्ये आल्यास त्यांना ही जीवे मारण्याची धमकी दिल्याने लोकांनी घाबरून तेथून निसटता पाय काढला व स्थानिकांनी आपआपली दारे, खिडक्या बंद केल्या.
आरोपींची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ३ व दत्तवाडी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे.
त्यांना न्यायालयात हजर केले असता आरोपींना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मिळाली.
वाचा : पुणे महानगर पालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची बदली,

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822