Crime branch news.com provided the latest Marathi news, Marathi police news, latest Marathi news, Pune police news, crime branch news, crime news pune,
Rupali Patil News : शिवाजीनगर पोलिसांनी केले होते न्यायालयात हजर.
Rupali Patil News : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
पुणे शहरात सध्या कोरोना ने पुन्हा डोके वर काढले आहे. तर पुणेकरांमध्ये भितीचे वातावरण आहे.
त्यात सुविधा उपलब्ध होत नसल्याने काहींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
असाच आंदोलनाचा पवित्रा माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यातील शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या जंम्बो कोविड रुग्णालय येथील गेटवर चढून घेतला होता.
सदरील घटने संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्याने रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात कारवाई करून स्थानबद्धतेसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
त्यामुळे त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होण्याची दाट शक्यता वाटत असल्याने त्यांना ८ ते २१ सप्टेंबर पर्यंत १४ दिवसांसाठी स्थानबद्ध करण्याबाबत आदेश देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली.
राजकीय कार्यकर्त्यांवर गुंडाविरोधात करायची कारवाई केल्याने त्याचा सोशल मीडियावर निषेध होऊ नये यासाठी न्यायदंडाधिकारी ए.एस. राणे यांनी पोलिसांची कारवाई फेटाळून लावली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, जंम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मृत्यू होत आहेत. एका पत्रकाराला आपला जीव गमवावा लागला आहे.
अशावेळी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार पोलिसांमार्फत करत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.