बकरी ईद व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट,
Bakra eid : शिरुर पोलीस ठाण्यात FIR दाखल असूनही माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ,

Bakra eid : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : राज्य सरकारने बकरी ईद संदर्भात काढलेल्या आदेशा बाबतीत मुस्लिम समाजामधून नाराजीचे सूर आहे,
नाराजीचे सूर असताना काही समाजकंटक सोशल मीडियावर बकरी ईद संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट करून समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार करत आहे.
तसेच त्या पोस्ट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या नावाचा एकेरी उल्लेख असल्याने शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी एका व्यक्तीला तात्काळ अटक केली आहे.
पुण्यातील ३ गुन्हेगारांना पोलिसांनी केले तडीपार,
मिळालेल्या माहितीनुसार सुभाष रामदेव जांभळे याने त्याच्या मोबाईल वरून
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद सणाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करत ती व्हायरल केली.
ही आक्षेपार्ह पोस्ट वेगळ्या मोबाईलवर पाठवून जनतेच्या मनात चुकीचासंदेश पसरवला आहे.
तर मुस्लिम समाजाची बकरी ईदवर असलेली श्रद्धा आणि त्या श्रद्धेचा शरद पवार यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने संबंध जोडून समाज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचे गांभीर्य पाहून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी शिरुर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता माहिती गोपनीय आहे तपास चालू आहे असे म्हणत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहे.
कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी ? ऍम्ब्युलन्स आणि पेंशट सह अल्का टॉकीज चौकात केले आंदोलन.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Demand Rs 25 lakh) मी दादांचा पी.ए बोलतोय म्हणत २५ लाखांची मागणी