मी दादांचा पी.ए बोलतोय म्हणत २५ लाखांची मागणी,

Demand Rs 25 lakh : मी दादांचा पी.ए बोलतोय म्हणत २५ लाखांची मागणी,

i-am-talking-about-dadas-pa-and-demand-rs-25-lakh
संग्रहित

Demand Rs 25 lakh :पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पिंपरीतील एका नामांकित हॉस्पिटलला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

यांच्या नावाने २५ लाखांची खंडणी मागणाऱ्याला निगडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे.

रात्रभर त्याच्यावर पाळत ठेऊन भल्या पहाटे आरोपीला पुण्यातील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.

बकरी ईद व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट,

सौरभ संतोष अष्टूळ (वय- २१, रा. लोहियानगर, गल्ली नं.१ गंजपेठ , पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिस चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी आरोपी विरूद्ध भा दं वि कलम ३८७, ५०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. श्रीकृष्ण गंगाधर जोशी यांना मोबाइलवर अज्ञात व्यक्तीनं फोन केला,

फोन करून म्हणाला कि मी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या ऑफिसमधून त्यांचा पी.ए.सावंत बोलतोय कोरोनाच्या महामारीमुळे गरीबांची अवस्था बिकट आहे.

त्यांच्या मदतीसाठी ताबडतोब २५ लाख रुपयांची रक्कम आमच्या पर्वतीच्या कार्यकर्त्याकडे पाठवून द्या नाही तर तुमचे हातपाय तोडून जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली.

याबद्दल डॉ. जोशी यांना संशय आला , त्यांनी थेट चंद्रकांत पाटील यांच्याकडे शहानिशा केली असता असा काही एक प्रकार नसल्याची माहिती डॉ.जोशी यांना मिळाली.

🖕 Click Here

त्यांनी निगडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.

पुण्यातील ३ गुन्हेगारांना पोलिसांनी केले तडीपार

पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी आरोपीला पकडण्यासाठी दोन पथके तयार केली.

पुणे शहरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेला मोबाइल, सिमकार्ड, एक मोटार सायकल असा एकूण 35 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी ऍम्ब्युलन्स आणि पेंशट सह अल्का टॉकीज चौकात 21 जुलै रोजी केले आंदोलन

video : मी दादांचा पी.ए बोलतोय म्हणत २५ लाखांची मागणी,

🖕 Click Here

One thought on “मी दादांचा पी.ए बोलतोय म्हणत २५ लाखांची मागणी,

Comments are closed.