अर्णब गो स्वामी वर कारवाई करा : गृहमंत्र्याना आमदारांचे पत्र
Arnab go swami news :आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण

अर्णब गो स्वामी वर कारवाई करा : गृहमंत्र्याना आमदारांचे पत्र,
Arnab go swami news : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्या पुर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये अर्णब गो स्वामी चे नाव असतानाही अद्याप कारवाई झालेली नाही,
कारवाई झालेली नसल्याने दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.त्यात कोणत्या कारणाने व कोणामुळे आत्महत्या केली त्यांची नावे आहेत.
बलात्कार करणार्या डॉक्टराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
त्याने व त्यांच्या आईने अलिबागच्या घरी आत्महत्या केली होती. परंतू या प्रकरणाचा तपास झालेला नाही.
नाईक कुटुंबीयांनी अनेक ठिकाणी दाद मागूनही त्या प्रकरणात कोणाला अटक झाली नाही असे या कुटुंबाचे म्हणणे आहे.
एफआयआरनुसार गो स्वामी याच्या मुंबईतील स्टुडिओचे काम आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या कंपनीने घेतले होते.
त्या कामापोटी उर्वरित रक्कम ८३ लाख रुपये गोस्वामी यांनी नाईक यांना काम पूर्ण झाल्यानंतरही दिली नाही.
वारंवार मागणी करूनही कामाचे हे पैसे परत न मिळाल्याने आर्थिक व मानसिक दडपण आल्याने अखेर नाईक यांनी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले असे सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे.
निष्काळजीपणाने काम करणारे २ पोलीस निलंबित
बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात ‘सुसाईड नोट’ ग्राह्य धरून आरोपीना अटक करण्यात आली होती.
तीच तत्परता आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात का दाखवली गेली नाही?
त्यामुळे आता नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी सुसाईड नोट व पत्नीने नोंदवलेली एफ.आय.आर ग्राह्य धरून आरोपीवर अटकेची पुढील कारवाई करायला हवी.
अशीही मागणी आमदार सरनाईक यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास का झाला नाही, असा प्रश्न विचारत कारवाईची मागणी केली आहे.
lockdown मुळे ४ महिन्यांचे भाडे थकले; घरमालकाने केली भाडेकरूला मारहाण

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822