तब्बल तिन महीन्यापासून पोलीसांना गुंगारा देणारा मोक्कातील आरोपी जेरबंद
खडक पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी
Crime branch news ; सदर बाबत अधिक माहिती अशी की , दिनांक २४/११/२०२२ रोजी सायं ०६.३० वा . चे दरम्यान फिर्यादी व साक्षीदार नातुबाग , शिंदे आळी , शुक्रवार पेठ , पुणे येथे गेले असताना फिर्यादी यांचे तोंडओळखीचा मंदार खंडागळे याने फिर्यादी व साक्षीदार यांचा रस्ता अडवून , फिर्यादीस ” आमचा भाई जंगळया सातपुते हा जेलमधुन सुटला आहे .
त्याने मला तुझ्याकडुन ४०,००० / – रु घेवून ये असे सांगीतले आहे ” असे म्हणुन फिर्यादी यांचेकडे खंडणीची मागणी केली .
परंतु फिर्यादी यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला याचा राग आल्याने मंदार खंडागळेने फियांदीस ” तुला अर्ध्या तासात बघुन घेतो ” अशी धमकी देवून तेथुन निघुन जावुन फिर्यादी व त्यांचे साथीदार हे घरी जात असताना डायमंड मित्र मंडळ , गंजपेठ ,
पुणे येथे आले व फिर्यादी हे यातील आरोपी उमेश बाघमारे यांचे वडीलांशी व कुमार लोंढे यांचेशी बोलत असताना उमेश वाघमारे हा तेथे आला व फिर्यादीस ” तु मंदारकडे पैसे का दिले नाहीस ? ” अशी विचारणा करुन ” तुला लय माज आला आहे का ? असे म्हणुन उमेश बाघमारे व कुमार लोंढे यांनी मिळुन फिर्यादीस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली ,
उमेश चाघमारे याने तेथे जवळच पडलेले खोरे घेवून ते जोरजोरात हवेत फिरवुन तेथील नागरिकांचे मनात दहशत निर्माण करणेसाठी ” माझं मध्ये कोण येतो ते मी बघतो . आता तुला खल्लास करतो ” असे ओरडुन फिर्यादीचा जीव घेण्याचे उद्देशाने फिर्यादीचे डोक्यात खोरे मारले .
त्याचवेळी आरोपी नामे आदित्य ऊर्फ भुडया चनसांडे हा तेथे कोयता घेवून आला व त्याने देखील फिर्यादी यांना उद्देशन ” याला सोडू नका मारुन टाका ” असे म्हणुन कोयता उमेश वाघमारेकडे दिला उमेश वाघमारे याने तो कोयता फिर्यादी यांचा जिव घेण्याचे उद्देशाने डोक्यात मारला त्यावेळी उमेश वाघमारे याचे साथीदार यातील आरोपी कुमार लोंढे याने सिमेंटचा ब्लॉक फिर्यादीस फेकुन मारला ,