तडीपार गुन्हेगारास गुन्हे शाखेने केली अटक,
Tadipar criminal arrested : तळजाई वसाहतीतून घेतले ताब्यात.
Tadipar criminal arrested :पोलीस न्यूज 24 :

शहरातून तडीपार असतानाही तडीपार आदेशाचे भंग केल्याप्रकरणी एका गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट ३ ने अटक केली आहे.
गुन्हे शाखा युनिट-३, पुणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीमध्ये प्रतिबंधक गस्त घालत असताना
पोलीस नाईक विल्सन डिसोझा यांना मिळालेल्या बातमी नुसार ओम मित्र मंडळासमोर तळजाई वसाहत पदमावती पुणे,
येथे रोडवर तडीपार गुन्हेगार ऋषीकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे २० वर्षे रा. माने गिरणीच्या मागे,
तळजाई वसाहत, पदमावती पुणे हा असल्याचे समजतात त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरुध्द सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न,
व गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्यास पुढील कारवाई करीता सहकारनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वाचा : पुण्यात बोगस रेशनकार्ड बनविणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल,
सदरची कामगिरी गुन्हे शाखा,पुणे शहर अपर पोलिस आयुक्त, अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त,गुन्हे पुणे शहर बच्चन सिंग,
डॉ.शिवाजी पवार सहा.पोलीस आयुक्त, प्रतिबंधक गुन्हे पुणे शहर ,यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,
पोलीस नाईक विल्सन डिसोझा, सहायक पोलीस उप-निरीक्षक राहूल घाडगे,मच्छिंद्र वाळके,सचिन गायकवाड यांनी केली आहे.
VIDEO : Covid19 मुळे मृत्यू झालेल्या पोलीसांच्या कुटुंबीयांना ५० लाखाचे सानुग्रह अनुदानाचे वाटप.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822