अजिम शेख हत्या प्रकरणातील 10 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई
हडपसर परिसरातील आदनान आबीद शेख याच्यासह त्याच्या टोळीतील 10 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई .
खून प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आदनान शेख आणि त्याच्या साथीदारांनी दि. 17 ऑगस्ट रोजी गुलाम अलीनगर परिसरात अजीम शेख या युवकाचा खून करून परिसरात दहशत निर्माण केली होती.
मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांपैकी टोळी प्रमुख आदनान आबीद शेख (25, रा. सैय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर), सादीक अब्दुल करीम शेख (56, रा. गुलाम अलीनगर, हडपसर), अनिस सादिक शेख (32), शाकीर कादर सैय्यद (30), मोहसीन जावेद शेख (24) आणि शेहाबाज कादीर शेख (28) यांना अटक करण्यात आलेली आहे.
तर जाकीर कादर सैय्यद (45), अमीर अकिल सैय्यद (20), सिकंदर आयुब शेख (35), आणि अकबर अफजल हुसेन शेख (43, सर्व रा. हडपसर) हे फरार आहेत.
टोळीचा म्होरक्या आदनान याने संघटित टोळी तयार करून परिसरात वर्चस्व व दहशत निर्माण व्हावी तसेच इतर अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा म्हणून गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.