गांजा विक्री करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक
Ganja Saler : गांजा विक्री करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक

Ganja Saler : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : गांजा विक्री करणाऱ्याच्या मुसक्या कोंढवा पोलिसांनी आवळल्या आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस शिपाई अजीम शेख व पोलीस शिपाई मोहन मिसाळ यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,
केदारेश्वर पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नंदनवन सोसायटीकडे जाणाऱ्या रोडवर टिळेकर नगर कोंढवा बुद्रुक पुणे येथे एक इसम गांजा विक्री करीत आहे.
खंडणी मागणा-या 12 वर्षीय मुलाच्या खुनातील आरोपींना अटक
हि खबर वरिष्ठांना कळविली व त्यांच्या आदेशानुसार सदर ठिकाणी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे व कर्मचाऱ्यांसह जाऊन सापळा रचला,
या सापळ्यात संजय राजू गायकवाड (वय २८ वर्षे ,रा:वृंदावन नगर गल्ली नंबर ८ कोंढवा कात्रज रोड,गोकुळ नगर पुणे)हा अडकला.
त्याच्याकडे ९५६ ग्रॅम गांजा व ३०० रुपये रोख रक्कम भेटली,
रकमेसह ताब्यात घेऊन संजय गायकवाड याच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरिल कार्यवाही सुहास बावचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, सुनील कलगुटकर सहाय्यक पोलीस आयुक्त,
विनायक गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महादेव कुंभार पोलीस निरीक्षक ( गुन्हे)
कोंढवा तपास पथकाचे पोलिस उप निरीक्षक संतोष शिंदे ,इकबाल शेख, योगेश कुंभार,कौस्तुभ जाधव,अझीम शेख,
सुनिल धिवार,दीपक क्षीरसागर, उमाकांत स्वामी,मोहन मिसाळ यांनी केली आहे.
महायुतीतील इतर घटक पक्ष तुमच्या बैलगाडीत बसलेले आहेत त्यांचं काय ?

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (murder-case) खंडणी मागणा-या 12 वर्षीय मुलाच्या खुनातील आरोपींना अटक