अवैध धंद्यांनमुळे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 5 पोलिसांच्या वेतनवाढीला लगाम

Pune police commissioner Order : अवैध धंदे रोखण्यास अपयश आल्याने पुण्यातील ६ पोलीसांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश,

Pune police commissioner Order: पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी :

पुणे शहरात अवैध धंद्यांना बंदी असतानाही राजरोसपणे सुरू असलेल्या धंद्यांना आळा घालण्याची,

प्रत्येक पोलीस ठाण्याची जबाबदारी असतानाही दुर्लक्ष करून हात झटकणा-यांविरोधात पुणे पोलीस आयुक्तांनी चांगलीच कारवाई सुरू केली आहे.

पुण्यात चोरी चोरी चुपके चुपके धंदे सुरू असून दुर्लक्ष केल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह इतर ५ जणांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिल्याने पोलीस खात्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

वाचा : ये तु कुठे चाललाय असे म्हणत खिशातील मोबाईल चोरत चोरटे झाले पसार,

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक ( गुन्हे) अजय वाघमारे,

सहायक पोलीस निरीक्षक राहूल गिरमकर,सहायक फौजदार राजू बहिरट (सध्या नेमणूक मुख्यालय),

पोलीस नाईक अशोक सी. गवळी, किशोर जी. सांगळे अशी वेतनवाढ रोखण्यात आलेल्यांची नावे आहेत.

येरवड्यात अवैद्य मटका, झुगार, दारुविक्री धंदे सुरु असतानाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख आणि

🖕 Click Here

( गुन्हे) पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांचावर पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक राहूल गिरमकर यांचेही येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभावी कर्तव्य नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

त्याशिवाय त्यांच्या हद्दीतील वसुली ही कर्मचारी किशोळ सांगळे करीत असल्याचे एका तक्रार अर्जात
नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार राजू बहिरट, अशोक गवळी, किशोर सांगळे यांनी वारंवार संशयित अवैध धंदेवाल्यांशी संपर्क साधल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

संबंधितांची कसुरी उघडकीस आली आहे. त्यामुळे सहाजणांविरुद्ध दोन वर्ष वेतनवाढ रोखण्याची‌ शिक्षा सुनावण्यात आली आहे.

वाचा : जागरूक पुणेकरांमुळे पुणे मनपाने काढलेले २८ लाख रुपयाचे टेंडर रद्द केले

🖕 Click Here

One thought on “अवैध धंद्यांनमुळे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 5 पोलिसांच्या वेतनवाढीला लगाम

Comments are closed.