गुन्हे शाखेकडून ७ लाख ६५ हजार रुपयांची विदेशी सिगारेट जप्त
Foreign cigarettes news : ७,६५,९६०/- चे विदेशी सिगारेट जप्त

Foreign cigarettes news : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : लॉकडाऊन च्या काळात पोट भर अन्न न मिळाल्याने अनेक नागरिकांना अर्ध्या पोटी राहून जगावे लागले तर अनेकांनी उपाशी राहून वेळ घालविला ,
याच काळात नशेडी लोकांनी त्यांच्या व्यसना पायी अनेक ठिकाणी काळ्याबाजाराने हि माल विकत घेतल्याचे अनेक उदाहरण आहे .
पुणे चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुक्ताई घुले कॉम्प्लेक्स, सैनिकवाडी, वडगांवशेरी पुणे.
या ठिकाणी एक व्यक्ती विदेशी सिगारेट विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली माहिती मिळताच गुन्हे शाखेकडून सापळा रचण्यात आला.
त्या सापळ्यात बनाराम गोमाजी चौधरी वय-३५ याच्यावर कारवाई करुन त्याच्याकडून वैधानिक चित्र व इशारा नसलेले ७,६५,९६०/- किमंतीचे विदेशी सिगारेट जप्त करण्यात आले.
या प्रकरणी चौधरी याच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात खटला दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील ट्राफिक पोलीसालाच ५ हजारांचा दंड
सिगारेट व आदर टोबॅको प्रॉडक्टस अॅक्ट २००३ चे कलम ७(२),२०(२) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे,पोलीस उप-आयुक्त बच्चन सिंग,
सहा पोलिस आयुक्त शिवाजी पवार,यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र माहिते,
पोलीस कर्मचारी पांडुरंग वांजळे, प्रमोद टिळेकर, सैय्यद साहील शेख, प्रदिप गाडे, मोहन येलपले यांनी कारवाई केली असल्याची माहिती मिळाली .

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822