वानवडी परिसरात 14 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार
(Gang raped in pune ) 8 नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
(Gang raped in pune) क्राईम ब्रांच न्युज प्रतिनिधी :
दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे .
मध्यंतरी दत्तवाडी परिसरात एका २८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असताना पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशीच घटना घडली होती
पुण्यातील वानवडी बजार परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .
या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे . आरोपी नराधमांनी पीडित मुलीचे रिक्षातून अपहरण केले .
पीडित मुलीला वानवडी परिसरात नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला .