रिक्षा चालकाने रिक्षात सापडलेले ८०,००० रुपये केले परत
Rickshaw driver’s honesty : रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा रिक्षात विसरलेले ८०,०००/- रुपये केले परत,

Rickshaw driver’s honesty : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कॅम्प परिसरातील महिलेस रिक्षात विसरलेली बॅग व बॅगेतील ८०,००० परत केल्याने रिक्षा चालकाचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तस्लम मगदुम घोणे वय-३६ वर्षे रा कॅम्प पुणे यांनी १३ ऑगस्टला बिबवेवाडी पोलीस ठाण्यात येवुन कळविले की त्या व त्यांचे पती मगदुम घोणे हे त्यांचे राहते पत्यावरुन रिक्षाने त्यांच्या बहिणीला भेटणे कामी बिबवेवाडी येथे आले होते.
दरम्यान त्यांनी त्यांची बॅग रिक्षाच्या मागच्या डिक्की मध्ये ठेवली होती व त्या बॅग मध्ये त्यांचे कागदपत्रे व रोख रक्कम ८०,०००/- रुपये होते ,
दरम्यान जोरात पाऊस पडत असल्याने ते दोघेही गडबडीत बिबवेवाडी येथे उतरल्याने त्यांची सदरची बॅग रिक्षा मध्ये विसरले त्याबाबत त्यांनी ऑनलाईन तक्रार दिली होती.
१४ वर्षा पासुन फरारी असलेला आरोपी अटक
१५ ऑगस्टच्या दिवशी तुळशीराम गणपत परदेशी ( वय ५२ वर्षे रा. भवानी पेठ पुणे ) यांनी पोलीस ठाणेस येवुन कळविले.
मी कॅम्प पुणे येथुन एक अपंग इसम व बुरखा घातलेल्या महिलेस बिबवेवाडी येथे सोडले होते.
त्यावेळी त्यांची ही बॅग माझ्या रिक्षा मध्ये विसरुन राहिली आहे. त्यामध्ये कागदपत्रे व रोख ८०,०००/ – रुपये आहेत.
असे कळविल्याने कर्तव्यास असलेले पोलीस उप निरीक्षक काळे व खेतमाळस यांनी लगेच ठाणे अंमलदार,
पोलीस हवालदार अलाटे यांना कळवुन सदर महिलेस फोन लावून पोलीस ठाण्यास बोलवल्याने त्यांनी त्यांची बॅग पाहुन ओळखली.
श्रीराम चौक परिसरात रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ते
रिक्षा चालकाने प्रामाणिक पणे त्यांची हरवलेली बॅग व त्यामधील कागदपत्रे,रोख रक्कम परत दिल्याने त्यांनी रिक्षा चालकाचे आभार व्यक्त केले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे,
सचिन खेतमाळस, सहा.पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय खुटवड, पोलीस हवालदार अलाटे, पोलीस शिपाई शितोळे लोखंडे यांनी केली आहे.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Pune bhavani peth) पुण्यातील मध्यवर्ती भागात चोरांनी फोडली दुकाने