हडपसरमध्ये पूर्ववैमनस्यातून १७ वर्षीय तरुणाचा खून.

Crime news: ‘आमच्यासोबत पंगा घेतला तर असाच मुडदा पाडू म्हणत अल्पवयीन मुलाची धारदार शस्त्राने हत्या

पुणे: पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हडपसर भागात अल्पवयीन मुलावर धारदार लोखंडी हत्याराने वार करून खून करण्यात आला आहे.

सहा ते सात जणांनी मिळून हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

कारचालकाला लुटणाऱ्या टोळीचा खडक पोलिसांनी २४ तासांत केला पर्दाफाश

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. हडपसर भागामध्ये पूर्ववैमनस्यातून टोळक्याने या १७ वर्षीय तरुणाचा खून केला आहे. स्वप्निल झुंबर्डे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

सनी रावसाहेब कांबळे, अमन साजिद शेख, तौफिक रज्जाक शेख, शाहरुख साजिद शेख,

आकाश हनुमंत कांबळे, जय शंकर येरवळे अशा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांचे नावे आहेत.

🖕 Click Here

Pen Camera   

मिळालेल्या माहितीनुसार स्वप्निल झुंबर्डे याला या तरुणांनी काल हडपसर भागात भेटून पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्याकडील धारदार लोखंडी हत्याराने डोक्यावर हल्ला केला.

या घटनेत स्वप्नीलचा जागीच मृत्यू झाला. तसेच या तरुणांनी त्यांच्याकडे धारदार लोखंडे हत्यारे हवेत फिरवून,

“आमच्यासोबत कोणी पंगा घेतला तर असाच एक एकाचा मुडदा पाडू”, असं ओरडत परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेमुळे परिसरात भितीच वातावरण पसरलं आहे. अधिक पोलिस तपास करत आहेत.

Smart Watch Camera 👁️

🖕 Click Here