कॅम्पात पोलिसांना मारहाण : दोन जणांना केली अटक,

beating-police-during-unmasked-action-pune
संग्रहित फोटो

लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कोरोनामुळे नागरिकांना मास्क, मुख पट्टी वापरणे अनिवार्य असताना काही नागरिकांकडून तोंडाला मास्क वापरले जात नसल्याने पोलीसांकडून सध्या कारवाई जोरात चालू आहे.

मास्कची कारवाई करताना नागरिकांमध्ये व पोलीसांमध्ये वादावादीचे प्रकार घडत असल्याने ते वाद पोलीसांना मारण्या पर्यंत गेले आहे.

असाच प्रकार कॅम्प येथे घडला आहे. पोलीसाला मारल्या प्रकरणी दोन जणांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबलू अन्वर सैय्यद वय २५ व आयुब जावेद शेख वय २०, दोघेही रा. लष्कर कॅम्प पुणे, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश कुलाळ यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

🖕 Click Here

लष्कर विनामास्क कारवाई करताना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या दरम्यान उपनिरीक्षक गणेश कुलाळ हे पथकासह मोहम्मद स्ट्रीट परिसरात विनामास्क नागरिकांवर कारवाई करीत होते.

त्यावेळी पोलिसांनी तेथे आलेल्या बबलू व आयुबला विनाकारण पदपथावर उभे राहू नका असे सांगितले.

त्याचा राग आल्यामुळे दोघांनी संगनमत करुन गणेश यांना मारहाण केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एच. एम. शिळमकर तपास करीत आहेत.

🖕 Click Here