शिक्षकाचा आठ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार
(Teacher abuses eight year old girl) शिक्षिका माहेरी गेल्याने शिक्षिकेचा पती दीड महिन्यापासून शिकवणीतील विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होता.
(Teacher abuses eight year old girl) क्राईम ब्रांच न्यूज प्रतीनिधी :
कल्याण डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच एका खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने आठ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे .
या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुरुवारी शिक्षकाला अटक केली आहे.
कल्याण पश्चिमेकडील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारी आठ वर्षीय विद्यार्थिनी याच परिसरात एका शिक्षिकेकडे शिकवणीसाठी जात होती.
शिक्षिका माहेरी गेल्याने या कालावधीत शिक्षिकेचा पती मुदर फकरुद्दीन तालवला ( ४२ ) गत दीड महिन्यापासून शिकवणीतील विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होता .
काही दिवसांपासून आठ वर्षीय विद्यार्थिनी शिकवणीसाठी जात नसल्याने तिच्या आईने शिकवणीला का जात नाही , याबाबत विचारणा केली असता त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला .