बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश जगताप यांच्या तक्रारीवर अनुसुचीत जाति आयोगाने मागितला पुणे पोलीसांना खुलासा
Shailesh Jagtap news:बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश जगताप यांच्या तक्रारीवर अनुसुचीत जाति आयोगाने मागितला पुणे पोलीसांना खुलासा
Shailesh Jagtap :Police News24 : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी शैलेश हरिभाऊ जगताप यांना पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून निलंबित करण्यात आले होते,
त्या संदर्भात चौकशी सुरू होती चौकशी अंती जगताप यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.
त्याची दखल घेत जगताप यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग महाराष्ट्र राज्याकडे लेखी तक्रार करून झालेल्या अन्याया विरोधात दाद मागितली होती.
त्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने संविधानातील अनुछेद 338 नुसार चौकशी चे आदेश दिले आहेत.
तसेच पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे हि काढलेल्या आदेशात नमूद आहे.
सदरील पत्र हे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या नावानी आल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले आहे.
Pingback: Tanker and a motorcycle | टँकर व मोटरसायकल ची समोरा समोर धडक