बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश जगताप यांच्या तक्रारीवर अनुसुचीत जाति आयोगाने मागितला पुणे पोलीसांना खुलासा
Shailesh Jagtap news:बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश जगताप यांच्या तक्रारीवर अनुसुचीत जाति आयोगाने मागितला पुणे पोलीसांना खुलासा

Shailesh Jagtap :Police News24 : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी शैलेश हरिभाऊ जगताप यांना पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून निलंबित करण्यात आले होते,
त्या संदर्भात चौकशी सुरू होती चौकशी अंती जगताप यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.
त्याची दखल घेत जगताप यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग महाराष्ट्र राज्याकडे लेखी तक्रार करून झालेल्या अन्याया विरोधात दाद मागितली होती.

त्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने संविधानातील अनुछेद 338 नुसार चौकशी चे आदेश दिले आहेत.
तसेच पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे हि काढलेल्या आदेशात नमूद आहे.
सदरील पत्र हे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या नावानी आल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले आहे.
हेपण वाचा : पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करन्याची मागणी
इतर बातमी: अपहरण करून खंडणी उकळणा-यास पोलिसांनी केले जेरबंद
Police News 24 :पुणे- १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४५ वाजता कांतिलाल गणात्रा (वय ६५, रा. मार्केटयाड)
हे तळेनगर सोसायटी येथील गंगाधाम रोडवरील सरकारी गोडाऊन जवळून जात असताना
अनोळखी तीन इसमांनी कांतिलाल गणात्रा यांचे अपहरण केले ,
त्यांचे अपहरण करून चारचाकी वाहनात कोंबून तेथून पळ काढला व त्यांचा मुलगा
महेश गणात्रा यास फोन करून धमकी दिली कि
जर २ कोटी नाही दिलेतर तुझ्या वडिलांचा खुन करू , या संदर्भात महेश गणात्रा यांनी पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला,
परिमंडळ-५ च्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे शाखे कडील अधिकारी व पोलिसांच्या वेगवेगळ्या टिम करून अपहरणकर्तेचा शोध घेण्याचे चालू केले.
अपहरणकर्त्यांनी सदरची रक्कम चांदनी चौक येथे मागविली महेश गणात्रा हे दीड कोटी रक्कम घेऊन ठरलेल्ल्या ठिकाणी पोहोचले व अपहरणकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे ठेवण्यात आले ,
सदरील रक्कम घेण्यासाठी आरोपी आले व रक्कम घेऊन पसार होत असताना मोटारसायकलवर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला .
आरोपी सुजित गुजर (वय २४, रा. उरूळी देवाची ता. हवेली,जि. पुणे), ओकार वाल्हेकर (वय २०, रा. उरूळी देवाची ता. हवेली, जि.पुणे)
याना पकडून तपास केल्यानंतर त्यांचा मुख्य सुत्रधार रा. अजय साबळे, (रा. मु.पो. वडकी नाला, ता. हवेली, जि. पुणे)अधिक वाचा

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: Tanker and a motorcycle | टँकर व मोटरसायकल ची समोरा समोर धडक