सय्यदनगर येथील कत्तलखान्यावर छापा: पाच जणांवर गुन्हे दाखल
Crime Branch News:
हडपसर : देशात गोमास विक्रीस बंदी असूनही अनेक ठिकाणी खुलेआम पणे गोमांस विक्री केली जात असते, अधिकांश ठिकाणी आजारी असलेले प्राणी कत्तल केले जातात तर काही ठिकाणी एखाद्या शेतकरी चे प्राणी चोरून आणून त्याची कत्तल करुन विकले जाते,
गोमांस विक्री करताना जी जनावरे शासनाच्या वैद्यकीय अधिकारी मार्फत तपासणी करुन कत्तल केली जाते, त्याच जनावरांचे मांस विकणे बंधन कारक असून ही अनेक ठिकाणी चोरून लपून आजारी प्राणी कत्तल केले जातात त्यामुळे त्यातील रोग हे नागरिकांमध्ये पसरत आहेत.
तसेच नागरिकांना धोका देऊन म्हैस व गायीच्या बछडा कत्तल करून त्याला मिक्स करुन विकले जातात. यामुळे नागरिकांची व शासनाची दिशाभूल होत आहे. असाच एक प्रकार हडपसर सय्यदनगर येथील कत्तलखान्यावर घडत असल्याची तक्रार वानवडी पोलिसांना मिळाली होती.
यावर पोलिसांनी छापा टाकला असून त्यावेळी तेथे सात कामगार गोमांसाचे तुकडे करताना आढळले , पोलिसांनी त्यांना अटक केली मात्र त्यातील दोघांनी पोलिसांची नजर चुकवून तेथून पळ काढला .
नितीन वाडकर ( वय ४१ , रा . वाडकर मळा ) .शाहजाद इस्लामुद्दीन अन्सारी ( वय ३४ , रा . हडपसर ) , कलील अब्बास कुरेशी ( वय ४० , रा . सय्यदनगर ) , आरीफ इब्राहिम कुरेशी ( वय ४४ , रा सय्यदनगर ) ,अलील अब्बास कुरेशी ( वय ३७ , रा . सय्यदनगर ) , अशी अटक केलेल्यांची नावे आहेत . सय्यदनगरमध्ये बेकायदेशीर कत्तलखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती , त्यानुसार त्यांनी छापा टाकला त्यावेळी तेथे गोमांस मिळाले ,