स्वीगी व झोमॅटोच्या डिलेव्हरी बॉयला अटक

(Swiggy and Zomato Delivery boy arrested)

उच्चभ्रू सोसायटीमधील तसेच रस्त्यावरील ये – जा करणा-या जेष्ठ महिलांवर पाळत ठेवुन त्यांचे मंगळसुत्र खेचुन करत होते चोरी.

(Swiggy and Zomato Delivery boy arrested) crime branch news प्रतिनिधी :

झोमॅटो व स्वीगी कंपनीची पार्सल डिलेव्हरी करणारे कर्मचारी ज्येष्ठ महिलांचे मंगळसूत्र

व इतर प्रकारची चोरी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर पोलीसांनी कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

तर त्यांच्याकडून १ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे.

हकीकत अशी की हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ जून रोजी दुपारी महिला फिर्यादी भारती विठ्ठल भाडळे वय ६० वर्षे राहणार ऊरळी देवाची साने गुरुजी मार्ग ता.हवेली जि.पुणे

हे निर्मल टाऊनशिप काळेपडळ हडपसर,

यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र दोन इसमांनी जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले बाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाचा : सराईत गुडांच्या अत्यविधीची रॅली काढुन फरार झालेले आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

गुन्हा हा भरदिवसा हा दाट लोकवस्तीत असलेल्या ठिकाणी घडलेला असल्याने तसेच आरोपींनी योगीराज सोसायटीचे आत प्रवेश केला असताना

त्याच्या पाठीमागून येवून गळ्यातील चैन जबरदस्तीने ओढून नेली,

गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली

तपासपथकातील अधिकारी व कर्मचा-यांनी भागातील सर्व सी.सी.टी.व्ही फुटेज पडताळणी केली.

अनोळखी ३ आरोपी फिर्यादी महिलेचा पाठलाग निर्मल टाऊनशिप काळेपडळ हडपसर ते योगीराज सोसायटी

या दरम्यान त्यांचेवर पाळत ठेवून त्यांचा पाठलाग करून केला असल्याचे निष्पन्न झाले.आरोपींनी त्यांचे गाडीस झोमॅटो डिलव्हरी बॅग लावलेली दिसली.

त्याच्याआधारे नमुद आरोपींचा सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे शोध घेत सुमारे ५०० हून अधिक रोड लगत असलेल्या दुकानाचे

व रोडचे बाजुचे कॅमे-यांच्या आधारे शोध घेत असताना गुन्हा केलेले आरोपी हे त्याचेकडील मोटर सायकलवरुन चंदनननगर,

खराडी पर्यंत गेले असल्याचे असल्याचे तपासात दिसून आले.

🖕 Click Here

तर २१ जून रोजी पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ व निखील पवार यांना मिळालेल्या बातमीचे आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड,

Swiggy and Zomato Delivery boy arrested

पोलीस उप निरीक्षक सौरभ मानेपोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, प्रदीप सोनवणे, शाहीद शेख, अकबर शेख , समीर पांडुळे, शशिकांत नाळे,प्रशांत टोणपे यांनी

शेवाळवाडी भागात सापळा रचून आरोपी आकाश सिध्दलिंग जाधव वय २३ वर्षे झोमेटो डिलेव्हरी बॉय रा. जहागीरनगर,

साज कंपनीसमोर शिंदेवस्ती हडपसर पुणे. मुळगाव- लेन नंबर-५, कावळा गल्ली सेंटलमेंन्ट सोलापुर,

विजय जगन्नाथ पोसा वय २२ वर्षे धंदा स्वीगी डिलेव्हरी बॉय रा. लेन नंबर- ४ तुळजाभवानीनगर खराडी पुणे,

साहिल अनिल गायकवाड वय २२ वर्षे धंदा जिम हाऊसकिपर सोलापुरर . मु.पो. सावरखेड, जय हनुमान तरुण मंडळाजवळ,

ता.सोलापुर यांना ताब्यात घेवूनत्यांचेकडे तपास केला असता आरोपी आकाश जाधव याने सांगितले

१६ जून रोजी दुपारी मी व माझे दोन साथीदार असे तिघेजण

एच.एफ.डिलक्स मोटर सायकलवरुन झोमेटोची डिलेव्हरी देण्यासाठी निर्मल टाऊनशिपमध्ये गेलो होतो.

डिलेव्हरी देवुन बाहेर आलो तेंव्हा सदर सोसायटी मधून एक महिला बाहेर आली.पाठोपाठठ जावुन त्याच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने ओढून दुचाकी गाडीवर निघून गेलो असल्यासांगीतले.

तसेच दाखल गुन्हा केल्यानंतर आत्मविश्वास वाढल्याने त्यांनी १९ जून रोजी अशाच प्रकारे चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत

दुपारच्या वेळेस महिलेच्या गळ्यातील जबरस्तीने मंगळसुत्र चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तीन्ही आरोपींना अटक करण्यात आली असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांचे सुचना व मागदर्शनाखाली कल्याणराव विधाते सहाय्यक पोलीस आयुक्त,

बाळकृष्ण कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

वाचा : कासेवाडीत 2 सराईत गुन्हेगारासह 1 तडीपार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

🖕 Click Here