कारचा १ हप्ता चुकल्याने महिलेस आयसीसी बॅंकेतून शिवीगाळ,
ICC Bank News :अरेरावी करत पार लायकी काढण्याचा प्रकार, पोलीसात तक्रार दाखल,
ICC Bank News : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार कोलमंडले आहे. आर्थिक व्यवहार पुर्वपदावर आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
त्यात बॅंकेच्या वसूली वाल्यांकडून अरेरावी, धमकी, शिवीगाळ करण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांचा मनस्ताप अनावर होत आहे.
एकजरी हप्ता चुकला की पार लायकी काढण्या पर्यंत मजल गेली आहे.
वाचा : बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल,
पुण्यातील एका महिलेने पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर सदरील प्रकार उघडकीस आला आहे.
मंगळवार पेठेतील वैशाली रेड्डी यांनी ३ वर्षा पूर्वी आयसीसी बॅंकेकडून कार लोन घेतले होते.
त्यांनी आत्ता पर्यंत नियमित पणे हप्ते भरलेले असून आर्थिक अडचणीमुळे फक्त ऑगस्ट महिन्याचा एक हप्ता भरता आला नाही.त्यामुळे बॅंकेतून त्यांना फोन येत होते.
या महिन्यात डबल पैसे भरून मागचा हप्ता क्लीयर करेल असे रेड्डी यांनी सांगितले असतानाही बॅंकेतून हप्ता भरण्यासाठी सारखेच फोन येत होते.
आज पुन्हा रेड्डी यांच्या मोबाईल फोन वर फोन आला,
मी आयसीसी बॅंकेतून शकुंतला बोलतीय तुमची लायकी नाहीये तर कशाला गाडी घेतली.
गाडी बॅंकेत आणून लावा. असे म्हणत अरेरावी करत घान घान शिवीगाळ केल्याने रेड्डी यांना धक्काच बसला असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.
एक हप्ता चुकला म्हणून शिवीगाळ केली गेली म्हणून फरसखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
video पहा : Corona पासुन बचावासाठी वानवडी पोलिसांचा संदेश

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822