पुण्यातील ट्राफिक पोलीसालाच ५ हजारांचा दंड
Pune police fined :वाहनचालकाकडून अडीच हजार रुपये घेतल्या प्रकरणी कारवाई.

Pune police fined : पोलीस न्यूज 24 : पुणे शहर ट्राफिक पोलीसांकडून नेहमी काही ना काही कारणाने चिरीमिरी लाटण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जाते.
या संदर्भात नागरिकांनी तक्रारी कुठे करायची याची माहिती नसल्याने ट्रॅफिक पोलिस याचाच फायदा उचलताना दिसतात.
सजग नागरिकांनी तक्रारी केल्या तर ट्राफिक पोलिसांवरही कारवाई होऊ शकते तेही दंडात्मक हे आज सिध्द झाले आहे.
पुण्यातील एका सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश बाबुराव दौंडकर यांना ट्राफिक पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू
यांनी ५ हजारांचा दंड मारल्याने ट्राफिक पोलिसांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी
दौंडकर हे विमानतळ ट्राफिक विभागात वाहनांवर कारवाई करणाऱ्या टेम्पोवर ऑपरेटर म्हणून कर्तव्यावर होते. वाहनचालक गाडी सोडवण्यासाठी दौंडकर यांच्याकडे गेला.
तेव्हा त्यांनी वाहन जप्त करण्याची आणि आरटीओकडे जाऊन दंड भरावा लागेल अशी भीती गाडी मालकाला दाखवली.
त्यानंतर टेम्पोचालक संजय बनसोडे आणि हेल्पर धर्मा यांच्याकडे निर्देश करून त्यांच्यामार्फत पैशाची मागणी केली.
त्यावेळी गाडी मालकाकडून अडीच हजार रुपये घेतले होते. याबाबत दाखल तक्रारीची उपायुक्त अक्कानवरू यांनी चौकशी केली.
त्यात दौंडकर यांनी पैसे घेतल्याचे आढळून आले.
पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे वर्तन केल्याप्रकरणी दौंडकर यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला,

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (2 police suspended )निष्काळजीपणाने कर्तव्य पार पाडणारे २ पोलीस निलंबित