दहशतवाद विरोधी पथकाकडून आणखी एकाला कोंढव्यातून अटक

Crime Branch News : पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी पहाटे पुणे शहरातील कोंढवा परिसरातून मोहम्मद युनूस मोहम्मद याकुब साकी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय-२३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा – मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना पकडले आहे.

पुणे : आरोपींना पुण्यात आल्यानंतर आश्रय देणाऱ्या व्यावसायिकाला पैसे पाठविणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअर सिमाब नसरुद्दीन काझीला (वय २७, रा. कौसरबाग, कोंढवा, मूळ रा. पंढरी रत्नागिरी) दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी अटक केली. तर मंगळवारी (दि. १) झुल्फिकार अली बरोडावाला याला अटक केली असून अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाच झाली आहे.सिमाब नसरुद्दीन काझीने अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) याला पैसे पाठवले. ते पैसे पठाणने पुण्यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना टेरर फंडिंगसाठी दिल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले आहे.पुण्यात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या प्रकरणाचा तपास सध्या महाराष्ट्र एटीएस करत आहे. महाराष्ट्र एटीएसने मंगळवारी (दि.१) झुल्फिकार अली बरोडावाला याला अटक केली आहे. NIA मुंबई कडील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या झुल्फिकारचा एटीएस कडे असलेल्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

🖕 Click Here

त्यामुळे एटीएसने न्यायालयाकडून प्रोडक्शन वारंट वरुन आरोपीला मुंबई मध्यवर्ती कारागृहातून वर्ग करुन घेऊन दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. त्याची पोलीस कोठडी घेऊन एटीएस तपास करत आहे. एटीएसने अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे. तर पुण्यातून फरार झालेल्या मोहम्मद शहनवाज आलम (वय ३१) या आरोपीचा शोध एटीएसच्या पथकाकडून केला जात आहे. तसेच फरार झालेल्या आरोपीला आणि गुन्ह्यातील आरोपींना फरार कालावधीमध्ये मदत करणाऱ्यांचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून केला जात आहे.

🖕 Click Here