CLUB 24 हुक्का बारवर पोलीसांचा छापा, ५ हजारांचा मुद्देमाल जप्त.
(CLUB 24 ) क्राइम ब्रांच न्यूज प्रतिनिधी पुणे :
सध्या अवैधरित्या हुक्का पार्लर ठिकठिकाणी जोरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तर त्याला लगाम घालण्यासाठी पोलीस दिवसरात्र एक करत आहेत.
कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये अवैधरित्या चालु असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेने ( Crime branch pune) छापा घातला आहे.
वाचा : वाहतूक पोलीस निरीक्षकावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
रविवारी (२५) दोराबजी महंमदवाडी रोड येथे हॉटेल CLUB 24 वर अवैधरित्या हुक्का बार चालु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
बातमीची खातरजमा करण्याकरीता सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांची विविध पथके स्थापन केली.
व सदरील हॉटेलवर अचानक पणे छापा टाकला असता हॉटेलचा मालक अमर खंडेराव लटुरे, (रा. महंमदवाडी,पुणे)
व हॉटेल मॅनेजर विक्रम सुखदेव जाधव,(वय-३० वर्षे ,रा.महंमदवाडी,पुणे) हे दोघे हॉटेल मध्ये बेकायदेशीर पणे हुक्का बार चालवुन ग्राहकांना हुक्का सेवन करण्याकरीता देत होते.
त्यांनी कोवीड-१९ विषाणु संसर्गाचे उल्लंघन केल्याने वरील हॉटेल चालक व मॅनेजर यांच्या विरुध्द सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने
(महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ कलम ४ अ,२१ अ, तसेच भादवि कलम १८८,२६९,२७० तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा कलम
२००५ चे कलम ७ (२),२०(२) अन्वये कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैद्य रित्या चालविणारे हुक्का पार्लर हे सील करून ४ चिलीम आणि इतर साहित्य असा एकुण ३५ हजार ६०० रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे,
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे गुन्हे शाखा,पोलीस उप-आयुक्त श्रीनिवास घाडगे,
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण ,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांडेकर,अंमली पदार्थ विरोधी पथक-२,गुन्हे शाखा यांनी केली आहे.
वाचा : दुश्मनाला संपविण्याची दिली सुपारी कोंढवा पोलीसांनी तीन गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त केल्याने होणारा अनर्थ टळला”