वाहतूक पोलीस निरीक्षकावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
(traffic police inspector) इंटेरिअर डेकोरेटरच्या कानाखाली पिस्तुल लावल्याने उडाली खळबळ.
(traffic police inspector) क्राइम ब्रांच न्यूज प्रतिनिधी पुणे :
काम करून घेत पैसे देण्याची वेळ आली असता कानाखाली बंदूक लावून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
असा प्रकार कोणी गुन्हेगाराने केलेला नसून तर एका पोलीस निरीक्षकाने केल्याचा प्रकार घडल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
समर्थ वाहतूक पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक राजेश पुराणीक यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हकीकत अशी की पुराणीक यांचे नाना पेठेतील घराचे इंटेरियर डेकोरेशनेचं काम कार्तिक रामनिवास ओझा यांना दिले होते.
वाचा : 50 हजाराची लाच घेताना प्रशासकीय अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळयात.
ओझा यांनी ७० टक्के काम केल्याने कामगारांना पगार देण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी पुराणीक यांच्याकडे तकादा लावला होता.
काम व्यवस्थित झाले नाही म्हणत इंटेरियर डेकोरेटर ओझा यांच्या कानाखाली बंदूक लावून दिलेले पैसे परत मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राजेश पुराणीक यांनी कानाखाली बंदूक लावून मारहाण केल्याची तसेच कुटुंबीयांचाही मानसिक छळ केल्याचा आरोप ओझा यांनी तक्रारीत केला आहे.
ऐका पोलीस निरीक्षकानेच असा प्रकार केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
ओझा यांच्या तक्रारीवरून राजेश पुराणीक यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाचा : एका नगरसेवकाच्या भावा सहित इतरांवर 420 चा गुन्हा दाखल

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (CLUB 24) कोंढव्यातील क्लब 24 हुक्का बारवर पोलीसांचा छापा