कोंढव्यात दगडाने ठेचून तरुणाचा खून

Murder of a young man : कोंढव्यात दगडाने ठेचून तरुणाचा खून :पुण्यात दुसऱ्या दिवशीही खूनाचे सत्र सुरूच,

Murder of a young man : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुणे शहरातील खूनाची घटना ताजी असतानाच आज पुन्हा पुण्यातील उपनगर भागात एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे .

खून करण्यात आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी या घटने बद्दल तीव्र निषेध व्यक्त करत रस्ता रोको केले .

सदरील आरोपींनी त्या परिसरात दहशत माजवली असून त्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

murder-of-a-young-man-by-crushing-a-stone-in-kondhwa

वाचा > पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या जवळ गोळ्या घालून खून,

विठ्ठल दांडे वय ३५, रा. कोंढवा असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.

🖕 Click Here

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल दांडे याचे आरोपींसोबत पूर्वीचे वाद होते.

आज सायंकाळी ते दारू पिण्यास कृष्णानगर भागात बसले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला.यावेळी आरोपींनी त्याचा दगडाने ठेचून खून केला.

माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे अधिक तपास पोलीस करीत आहे.

वाचा > Uttar Pradesh ya Rapist Pradesh

🖕 Click Here