हडपसर मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकरांसहित ४१ जणांवर गुन्हे दाखल,

Yogesh tillekar arrested : तीन दिवसांसाठी येरवडा कारागृहात रवानगी.

Yogesh tillekar arrested : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

पुणे महानगर पालिकाकडून पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने व अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही पाणी मिळत नसल्याने .

भारतीय जनता पार्टीचे हडपसर विधानसभा मतदार संघातील माजी आमदार योगेश टिळेकर व ४१ जणांनी स्वारगेट पाणी पुरवठा विभागात आंदोलन केले,

आंदोलन केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा > पुणे पोलिस आयुक्त कार्यालया जवळच गोळ्या घालून एकाचा खून

महापालिकेच्या वडगाव जलशुध्दीकरण केंद्रा अंतर्गत आठवड्यातून एक दिवस काही भागातील पाणी पुरवठा बंद केला जातो.

जल केंद्रातून गेली २ वर्षे ही पाणी कपात करण्यात येत आहे. पाणी कपात बंद करून १ ऑक्टोबरपासून सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन महानरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिले होते.

🖕 Click Here

तरीही पाणी त्याभागातील नगरसेवकांनी स्वारगेट येथील कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता आशिष जाधव यांना जाब विचारला.

तेव्हा पुरवठा सुरळीत न झाल्याने टिळेकर आणि जाधव व आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

याबाबत महापालिकेकडून स्वारगेट पोलिस ठाण्यात आषिश जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर माजी आमदार योगेश टिळेकर, त्यांची आई नगरसेविका रंजना टिळेकर,

नगरसेविका राणी भोसले, नगरसेविका मनिषा कदम, वृषाली कामठे यांच्यासह ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे.

वाचा > नगरसेवक गफुर पठाण यांच्या स्वनिधीतून 2 व्हेंटिलेटर चे वाटप.

🖕 Click Here