कोंढव्यात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरोधात एमपीडीए ची कारवाई

पुणे : कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरोधात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई’ केली आहे .

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ही ३५ वी कारवाई केली आहे. सोहेल नवाज शेख ऊर्फ पठाण (२२, रा. आश्रफनगर, कोंढवा बुद्रुक) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह कोंढवा व वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयता, चॉपर, तलवार, सुरा, लोखंडी रॉड या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, दंगा यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.

हेपण वाचा : पुण्यातून तीन वर्षांत २ हजार ६०९ मुली-महिला बेपत्ता

मागील पाच वर्षात त्याच्याविरुद्ध १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था सुरळीत राहण्यास बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

🖕 Click Here

पठाण विरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करून आयुक्तांनी आरोपी सोहेल नवाज शेख ऊर्फ पठाण याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

ही कामगिरी कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पीसीबी गुन्हे शाखा पोलिस उपनिरीक्षक राजू बहिरट यांनी केली आहे.

 हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह सहा जणांना अटक

🖕 Click Here