अबब.. ३ लाखांचे कोकेन जप्त : पुणे शहरात मोठ्ठी कारवाई,
3 lakh rs cocaine seized : कोंढवा – येवलेवाडी रोड, श्री बियर शॉपी समोर कारवाई
3 lakh rs cocaine seized : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे.
पुणे सारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर कोकेन सापडल्या प्रकरणी खळबळ उडाली आहे.
३ लाखांपेक्षा जास्त रक्कमेचा कोकेनचा साठा जप्त करण्यात आला आहे.
टांझानिया, दक्षिण अफ्रिका येथील इसमाकडुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३ लाख ३० हजार किंमत रुपयाचे कोकेन जप्त करुन त्याला अटक केली आहे.
कोंढवा – येवलेवाडी रोड, श्री बियर शॉपी समोर मरळ नगर, कोंढवा खुर्द, पुणे,
येथे एक परदेशी नागरिक संशयित रित्या ॲक्टिवा मोपेड वर थांबला असल्याचे पोलीस निरीक्षक विजय टिकोळे व सहा.पोलीस निरीक्षक बापु रायकर यांच्या निदर्शनास आले.