(Mocca field against criminals) बळजबरीने ८ लाख ७४ हजार हिसकावुन नेल्याचा प्रकार.
(Mocca field against criminals) Crime Branch News प्रतिनिधी : १४ जून रोजी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडील ८ लाखांपेक्षा जास्त रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
त्या अनुषंगाने पोलीसांनी चक्र गरागर फिरवून आरोपींचा छळा लावला होता. तर आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हकीकत अशी की मगर पेट्रोल पंप सय्यदनगर हडपसर , पेट्रोल पंपाचे मॅनेजर बाळासाहेब पंढरी अंभोरे
(वय ३६ वषे रा. फ्लॅट नंबर २, उद्योगनगर, गल्ली नंबर २, रॉयल हिल डेअरीचे गल्लीमध्ये , गंगा व्हिलेज समोर, हांडेवाडी रोड, हडपसर पुणे.)
हे पेट्रोलपंपाची कॅश बँकेत भरणेसाठी जात असताना दोन अनोळखी इसमांनी टोपी घातलेले जॅकेट घालुन
तोंड रुमालानी बांधुन कोयत्याचा धाक दाखवुन मॅनेजर याचेकडील रोख रक्कम रु ८ लाख ७४ हजार २५० रुपये जबरदस्तीने हिसकावुन नेली होती.
त्याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी सतत चार दिवस कठोर परिश्रम घेवुन सय्यदनगर,
हडपसर भागातील सी.सी.टि.व्ही.फुटेज चेक करुन आरोपी १) अरबाज नवाब पठाण (वय १९ वर्षे रा. फ्लॅट नंबर ए/१२, जैन टाऊन शिप, हांडेवाडी रोड हडपसर पुणे.)
२) तालीम आसमोहम्मद खान (वय २० वर्षे रा. गल्ली नंबर ३/ए, लाकडाचे वखारीजवळ, सय्यदनगर, हडपसर पुणे)
३) ऊबेद अन्सार खान (वय २३ वर्षे रा. नालबंदचाळ, ज्योतीचंद भाईचंद सराफ दुकानाजवळ, हडपसर पुणे सध्या कौशल्य सोसायटी, फ्लॅट नंबर २०३, चिंतामणीनगर, हडपसर पुणे.)
४) प्रजोत कानिफनाथ झांबरे (वय २० वर्षे रा. गल्ली नंबर १, चितामणीनगर, मगर पंपाचे जवळ, हडपसर पुणे.)
५) अजीम ऊर्फ आंटया महंमद हुसेन शेख (वय २२ वर्षे रा. गल्ली नंबर १२, सय्यदनगर, हडपसर, पुणे)
६) शाहरुख ऊर्फ अट्टी रहीम शेख, (रा.गल्ली नं. २३/ए, सय्यदनगर, हडपसर, पुणे )यांना निष्पन्न करुन यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडुन रोख रक्कम ५ लाख ७९ हजार ८०० रूपये, गुन्हयात वापरलेल्या दोन ॲक्टिवा मोपेड,
दोन जर्किंग,फिर्यादी यांची कॅश घेवुन जात असलेली डफल बॅग, त्यामधील बँकेच्या स्लिपा आरोपी यांचेकडुन जप्त करणेत आलेल्या आहेत.
आरोपी ऊबेद अन्सार खान (वय २३ वर्षे रा. कौशल्य सोसायटी, फ्लॅट नंबर २०३, चिंतामणीनगर, हडपसर पुणे.)
याचेकडुन समर्थ पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला आहे.
मोक्का कारवाई करण्यास मंजुरी मिळणेबाबतचा प्रस्ताव तयार करुन तो अपर पोलीस आयुक्त, गुन्हे अशोक मोराळे यांना सादर केला.
त्यांनी प्रस्तावाच्या कागदपत्रांची पाहणी करुन मोक्का अंतर्गत प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
त्यानंतर आरोपी विरुध्द यमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) हे कलम वाढ करण्यात आली आहे.