मोक्का गुन्हयात तीन महिन्यापासुन फरार असलेला आरोपी पोलीसांच्या ताब्यात.

Crime branch news :

२७ जून रोजी रात्रीचे स.नं. ५४/२, अरणेश्वर आण्णा भाऊ साठे वसाहत, सहकारनगर पुणे येथे दोन गटात झालेल्या भांडणावरून सहकारनगर पोलीस स्टेशन येथे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

त्यामधील सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. १४४/२०२३ भा.द.वि.क. ३९५, ३२३, ४५२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ४२७,५०६(२),आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ | अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२). ३ (४) प्रमाणे दाखल गुन्हयातील काही आरोपी मिळून येत नव्हते.

शाळेत शिकवायला शिक्षकच नसल्याने पालकांनी टाळे ठोकत शिक्षण विभागाला शिकविला धडा.

दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी यांचा .संजय सुर्वे सहाय्यक पोलीस आयुक्त सो लष्कर विभाग पुणे, .सुरेंद्र गजेंद्र माळाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास| पथकाचे राहुल खंडाळे व तपास पथकाचा स्टाफ तपास करीत असताना पोलीस उप-निरीक्षक राहुल खंडाळे,

पोलीस हवालदार सुशांत फरांदे व पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे अमर आनंत काथवटे रा. आण्णा भाऊ साठे वसाहत, अरणेश्वर पुणे

हा त्याच च्या मैत्रिणीस भेटण्यासाठी नवनाथ चौक, फॉरेस्टच्या भिंतीजवळ आंबेगाव पठार पुणे येथे येणार आहे.

🖕 Click Here

मराठी/हिंदी न्यूज चॅनेल सजग नागरिक टाइम्स शी व्हाट्सएपवर कनेक्ट व्हा आणि हेल्थ, वेल्थ, Stock market, क्राईम, राजकारण जगताशी संबंधित ठळक बातम्या ऑनलाईन ऑफर ची महिती मिळवा.

सदर भागात सापळा लावुन त्यास ताब्यात घेवुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणुन दाखल गुन्हयात अटक केली आहे.

सदरची कामगीर अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील,, पोलीस उपायुक्त परिमंडळ – २, श्रीमती स्मार्तना पाटील , सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर,

.संजय सुर्वे सहाय्यक पोलीस आयुक्त सो लष्कर विभाग पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, संदीप देशमाने पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे,

पोलीस अंमलदार बापु खुटवड, भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, बजरंग पवार, अमोल पवार, निलेश शिवतारे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, विशाल वाघ यांनी केली आहे.

🖕 Click Here