कोंढव्यातील हुक्का पार्लर वर कार्रवाई

Kondhwa police News : कोंढवा पोलिसा‍ंची कामगिरी ,कोंढव्यातील हुक्का पार्लरवर कार्रवाई , दोन जणांवर गुन्हे दाखल,

kondhwa-police-action-at-the-hookah-parlor-police-news-24

kondhwa police Action : Police News 24 प्रतिनिधि : पुणे शहरातील उपनगर भागात राजरोसपणे सुरू असलेले हुक्का पार्लरवर कोंढवा पोलिसांनी धाडी टाकून गुन्हे दाखल केले आहे.

हकीकत अशी की कोंढवा भागातील (Omkar Garden)ओंकार गार्डन शेजारील इमारतीत खुलेआमपणे (Hookah parlour)हुक्का पार्लर

चालू असल्याची खबर पोलीस नाईक सुशिल धिवार व नागनाथ फडतरे यांना मिळाली होती.

खबऱ मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांची परवानगी घेऊन टीम तयार करून

(Omkar Residency) ओंकार रेसिडेन्सी येथील इमारतीत सुरू असलेले बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला

व संबंधित (Hookah parlour) हुक्का पार्लर मालक ओम राजेंद्र तांदळे वय वर्षे 37 रा. बालाजी नगर धनकवडी व पवन कुमार किसन भादुर छत्री उर्फ सावंत रा. बालाजी नगर धनकवडी,

यांच्यावर सिगारेट व अन्य तंबाखू जन्य उत्पादन ( महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आणि सदरील हुक्क्याचे सामान जप्त करण्यात आले आहे, सदरची कारवाई पोलीस उपायुक्त सुहास बावचे.

सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर , कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड,

🖕 Click Here

पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे,

पोलीस नाईक सुशिल धिवार व फडतरे यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे याची दखल घेत वरिष्ठांनी पोलीस नाईक धिवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असल्याची माहिती मिळाली.

इतर बातमी : टू व्हिलर शो रूम मध्ये गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने जावून मोटर सायकल चोरणारा गजाआड

 Police News 24 : January 8, 2020 : पुणे : टू व्हिलर शो रूम मध्ये गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने जावून मोटर सायकल चोरून पसार झाल्याची तक्रार वानवडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली होती,

वानवडी पोलीस स्टेशन मधील तपास पथकातील पोलीस शिपाई नवनाथ खताल व महेश कांबळे यांना बातमी मिळाली होती की

नोहेल अँथोनी नावाचा आरोपी हा अश्याप्रकारे गाड्या चोरण्याचे कृत्य करत आहे.

या नोहेल अँथोनी ला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला व तो पोलिसांच्या सापळ्यात अडकला

या नोहेल अँथोनीला अटक करून अधिक तपास केला असता त्याच्याकडून दोन बुलेट व एक यप्रेला मोटारसायकल मिळून आली,अधिक वाचा

🖕 Click Here

3 thoughts on “कोंढव्यातील हुक्का पार्लर वर कार्रवाई

Comments are closed.