अवैधरीत्या चालणा-या मसाज पार्लर व आयुर्वेद मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा
Ayurveda massage center : हडपसर व धनकवडी भागात अवैधरीत्या चालणा-या मसाज पार्लर व आयुर्वेद मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा

Ayurveda massage center : Police news 24 : पुणे : सध्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे,
कोरोना सारख्या विष्णूचा संसर्ग प्रादुर्भाव होवू नये यासाठी जिल्हाधिकारी पुणे जिल्हा व महापालीका आयुक्त पुणे शहर
यांनी वेळोवेळी आदेश पारीत केले असताना देखील पुणे-सातारा रोड, शिवसागर सोसा. चैतन्यनगर, धनकवडी या ठिकाणी
कस्तुरी आयुर्वेदीक मसाज सेंटर हे अवैधरीत्या चालू असल्याची खात्रीशीर माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांना मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन
सदरील ठिकाणी पोलीस स्टाफसह छापा टाकून कारवाई करुन त्या ठिकाणाहून ०५ महिला व ०१ इसम अशा एकूण ०६ जणांना ताब्यात घेण्यात आले .
त्यांच्यावर भारतीविद्यापीठ पोलीस .स्टेशन येथे भा.दं वी.क. १८८, २६१, २०० व महाराष्ट्र कोबिड १९ उपाय योजना २०२० चे क. ११
तसेच साथीचे रोग प्रतिबंध कायदा १८५७ चे क. २, ३, ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच हडपसर पो.स्टे. च्या हद्दीमध्ये न्यु लोटस आयुर्वेदीक पंचकर्म, भोसले गार्डन, सोलापूर रोड,
हडपसर या ठिकाणी अवैधरित्या चालणा-या आयुर्वेदीक पंचकर्म सेंटरवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून कारवाई केली ,
येथून ०२ महिला व ०१ इसम यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर हडपसर पो.स्टे. येथे भा.द.वी. कलम. १८८, २६९, २७०
व महाराष्ट्र कोविड १९ उपाय योजना २०२० चे क. ११, तसेच साथीचे रोग प्रतिबंध कायदा १८५७ चे कलम. २, ३, ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर दोन्ही सेंटर मध्ये कोणतीही अत्यावशक व योग्य सुविधा न वापरता काम चालू होते,
कोरोना सारखा संसर्गजन्य रोग पसरू शकतो व सदर रोग हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत झालेला आहे
हे माहिती असताना देखील तोंडाला मास्क न वापरता कोणतीही खबरदारी न घेता काम चालू होते म्हणून दोन्ही सेंटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कारवाई हि अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, बच्चनसिंग पो.उप.आयुक्त गुन्हे,
यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे व पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके, यांचेसह सामाजिक सुरक्षा विभागाकडील,
पोलीस कर्मचारी महिला पोलीस मोहीते, माने. पठाण, शिंदे, खाडे, कोळगे, गायकवाड यांनी केली.
घरफोडी व चोरी च्या प्रकरणात शिकलगरी टोळीतील गुन्हेगाराना अटक

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822