हडपसरमधील सुंधा ज्वेलर्स कडून नागरिकांची फसवणूक ?
22 कॅरेट सोने बोलून विकले जात आहे 18 कॅरेट सोने?
एका तोळ्यामध्ये 10 ते 11 हजार रुपयांचा पडतो फरक,
जसे नागरिक डॉक्टरवर विश्वास ठेवून औषधे घेतो तसेच अनेक नागरिक हे सोनारावर अंध विश्वास ठेऊन सोने विकत घेत असतात,तसेच वर्षानुवर्षे त्या सोनारा कडून सोने विकत घेत असतात व त्याच्या दुकानाला आपली दुकान समजून मित्र मंडळी ,नातेवाईकांना रेफर करत असतात.
याचाच गैरफायदा घेऊन पैश्यासाठी हपापलेले काही लोक या धंद्यात येऊन नागरिकांच्या विश्वासा सोबत खेळून त्याचा गैरफायदा घेऊन नागरिकांना लुटत आहे.त्यातीलच एक हडपसर सय्यद नगर मधील सुंधा ज्वेलर्स असून 22 कॅरेट सोने बोलून 18 कॅरेट सोने विकत असल्याचे उघड झाले आहे.
22 कॅरेट व 18 कॅरेट सोन्यामध्ये साधारण 10.000 रुपये तोळ्याचा फरक असल्याचे अनेक सोनारांनी सांगितले असून 18 कॅरेट सोन्यात अनेक धातू मिक्स असल्याने ते कमी वजनात मोठे दागिने दिसत असल्याने 18 कॅरेट सोने नागरिकांना आकर्षित करतात ,याचाच गैरफायदा घेऊन सुधा ज्वेलर्स हे 22 कॅरेट सोने असल्याचे भासवून 18 कॅरेट सोने महागड्या किमतीत विकत असल्याचे उघड झाले आहे,
काही दिवसापूर्वी सय्यदनगर भागातील एका ग्राहकाने सुधा ज्वेलर्सकडून दागिने विकत घेतले होते त्यावेळी सोने देताना त्यांनी सांगितले की हे सोने 22 कॅरेट चे आहे तसेच त्यांनी ते लिहून ही दिले, परंतु काही दिवसातच त्या दागिन्याचे तुकडे पडू लागले या संदर्भात संशय आल्याने इतर ठिकाणी याची माहिती घेतली असता असे समजले की हे 22 कॅरेट चे सोने नसून हे 18 कॅरेट सोने आहे,तसेच याची शासन मान्यता प्राप्त लैब मध्ये टेस्ट केली असता त्यात पण 18 कॅरेटचे सोने असल्याची रिपोर्ट मिळाली आहे.
या सुंधा ज्वेलर्सने 22 कॅरेट चे पैसे घेतले व 18 कॅरेट सोने दिले असून त्यांनी फसवणूक केल्याची तक्रार त्या ग्राहकाने केली आहे. ज्यांनी ज्यांनी सुधा ज्वेलर्सकडून सोने विकत घेतले आहे त्यांनी आपले सोने हे शासन मान्यता प्राप्त लैब मध्ये तपासून घ्यावे कि आपली काही फसवणूक तर झालेली नाहीना ? ज्यांना सोनाराच्या फसवणुकी विरोधात तक्रार करायची असेल तर 9284447822 या नंबर वर संपर्क करू शकता अथवा पोलीस ठाण्यात करू शकता.