हमारे एरीया में दिखनेका नही,दिखा तो हाथ-पैर तोड देंगे ” अशी धमकी देवुन मारहाण,

(criminal case registered) वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

(criminal case registered) क्राईम ब्रांच न्यूज (प्रतिनिधी) :पुणे : आजकाल स्वतःच्या जागेतपण जाणे गुन्हा ठरत आहे,

स्वताच्या जागेत गेले असता एका २८ वर्षीय तरुणाला महंमदवाडी येथे बेदम मारहाण करण्यात आली आहे.

या प्रकरणी तक्रारदाराने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचे मौजे महंमदवाडी स.नं ८५, लक्ष्मीनगर महंमदवाडी हडपसर येथे प्लॉट आहे .

ते प्लॉटवर गेले असता ६ ते ७ साथ जण तेथे येऊन “तुम लोग हमारे एरीया मे आनेका नही” असे म्हणुन त्यांच्या हातातील लोखंडी पाईप,

प्लॅस्टीक पाईप व हॉकी स्टीकने फिर्यादी यांच्या पाठीवर डाव्या हाताचे खांदयावर,

उजव्या पायाच्या मांडीवर, कमरेवर उजव्या बाजुला, डाव्या पायाचे पोटरीव मारहाण केली.

वाचा : तलवारीने केक कापून बर्थडे साजरा करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक,

तसेच त्यांच्या हातातील हत्यारांसहीत येवुन अरडा-ओरड करुन परिसरात दहशत माजवली .

त्यांच्या दहशतीने नागरीकांनी घरे बंद करुन घेतली.

🖕 Click Here

त्यानंतर फिर्यादी यांना मोटर सायकलवर बसवुन वाडकर मळयाकडे जाणा-या रोडवर सुनसान ठिकाणी नेवुन पुन्हा मारहाण करण्यात आली .

व फिर्यादी यांच्या खिशातील पाकीटा मधील ५ हजार रुपये जबरदस्तीने काढुन घेवुन,

“इसके बाद हमारे एरीया में दिखनेका नही,दिखा तो हाथ-पैर तोड देंगे ” अशी धमकी देवुन निघुन गेले.

आणि फिर्यादी यांचे मित्र यांचेही कमरेवर,दोन्ही हातावर व दोन्ही पायावर मारहाण करून जखमी केले आहे.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णु वाडकर करीत आहेत.

वाचा : ऑनलाईन वर्ग सुरू असताना समोर आले पॉर्न व्हिडिओ,

🖕 Click Here

2 thoughts on “हमारे एरीया में दिखनेका नही,दिखा तो हाथ-पैर तोड देंगे ” अशी धमकी देवुन मारहाण,

Comments are closed.