ऑनलाईन वर्ग सुरू असताना समोर आले पॉर्न व्हिडिओ,

(online class) खेड पोलिसांनी केला गुन्हा दाखल. पालक चिंतीत.

(online class ) क्राईम ब्रांच न्यूज (प्रतिनिधी) :पुणे : कोरोनामुळे गेल्या दिड वर्षापासून शाळा सुरू झालेल्या नाहीत.

तर शाळांकडून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतले जात आहे.

परंतु ऑनलाईन शिक्षणही आता लहान चिमुकल्यांना घातक ठरत आहे.

ऑनलाईन शिक्षण घेता घेता घाणेरड्या जाहिराती, पॉर्न व्हिडिओ समोर येत असल्याने शाळांची व पालकांची धडकीच भरत आहेत.

असाच प्रकार खेड येथील एका शाळेत घडल्याने धक्काच बसला आहे.

खेड राजगुरुनगर येथील केटीईएस स्कूल वरील झूम अॅपवर ऑनलाईन शिक्षण सुरू असतानाच पॉर्न व्हिडिओ चालू झाल्याने खळबळ उडाली आहे.

याची दखल घेत खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी स्वतः शाळेत जाऊन चौकशी केली आहे.

वाचा : बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारी टोळी ताब्यात,

Porn-video-surfaced-during-online class

सदरील शाळेतील अॅपवरील डाटा जप्त करण्यात आला आहे.

🖕 Click Here

शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री दोंदे यांनी शाळेची पाहणी केली असून सदरील घटना निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अश्या घटनेने पालकही भयभीत झाले आहे.‌ पाल्यांच्या हातात मोबाईल द्यायचे कि नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आज अनेक अॅप बाजारात आल्या असून तो अॅप हाताळताना काही वेळा घाणेरड्या जाहिराती देखील समोर येत आहे.

याची दखल आता सायबर पोलीसांनी घेण्याची मागणी होत आहे.

वाचा : परदेशात नोकरी लावण्याच्या अमिषाने गंडा घालणा-या महिलेला अटक,

🖕 Click Here